आर्यभट्ट रिसर्च इन्स्टिटय़ूट ऑफ ऑब्झर्वेशनल सायन्सेस या संस्थेतर्फे नैनितालजवळील देवस्थळी येथे बेल्जियमच्या सहकार्याने आशियातील सर्वात मोठय़ा दुर्बिणीची उभारणी करण्यात आली आहे. या दुर्बिणीच्या निर्मिर्तीमध्ये पुण्यातील प्रिसिजन प्रिकास्ट सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतील अभियंत्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
दुर्बिणीचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच ब्रुसेल्स येथून केले. आशियातील सर्वात मोठय़ा असलेल्या दुर्बिणीचा व्यास ३.६ मीटर एवढा आहे. त्यासाठी लागणारी अत्याधुनिक आणि वैशिष्टय़पूर्ण इमारत, त्यावर असलेला फिरता डोम (घुमट) आणि अन्य तांत्रिक गोष्टींचे आरेखन पुण्यातील कंपनीने केले असून या उभारणीसाठी त्यांनी सल्लागार आणि मार्गदर्शक म्हणूनही काम केले आहे. अभियंत्यांच्या या कामगिरीबद्दल त्यांचा सत्कार आमदार प्रा. मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आला.
इमारतीचे वैशिष्टय़ म्हणजे ४५० टनांची आणि १० मजल्याएवढय़ा उंचीची ही इमारत पूर्णपणे स्टीलची असून यावर १७२ टनांचा १६.३ मीटर व्यासाचा व ५ मजल्याएवढय़ा उंचीचा दंडगोलाकृती अवाढव्य फिरता डोम बसविण्यात आला आहे. फिरत्या डोमवर ५.४ मीटर रुंद व १४ मीटर उंचीचे आकाराने खूप मोठे असे सरकते दार बसविण्यात आलेले आहे. त्यातूनच ही महाकाय दुर्बणि अवकाशातील ताऱ्यांचे निरीक्षण करणार आहे.
देवस्थळी हे ठिकाण ननितालजवळ समुद्रसपाटीपासून २५०० मीटर उंच असून अत्यंत दुर्गम असे आहे. येथे मोठय़ा क्षमतेच्या क्रेन्स नेणे किंवा टॉवर क्रेन उभी करणे असे पर्याय शक्य नव्हते. अशा परिस्थितीत या महाकाय दुर्बणिीच्या उभारणीची व्यवस्था करण्याचे आव्हान पी. पी. एस. कंपनीच्या अभियंत्यांपुढे होते. कंपनीच्या अभियंत्यांनी ते आव्हान स्वीकारत १५० टनांच्या या दुर्बणिीची उभारणी कोणत्याही बाहेरील क्रेनची मदत न घेता डोममधेच क्रेन्स बसवून केले. क्रेनच्या साहाय्याने दुर्बणि उभारणीचे काम करता येईल अशा पद्धतीचा डोम डिझाइन केला व या अडचणीवर त्यांनी मात केली. बाहेरील जमिनीतील अतिसूक्ष्म स्पंदने सुद्धा ताऱ्यांच्या निरीक्षणावर विपरीत परिणाम करू शकतात, या गोष्टीचा शास्त्रीय अभ्यास करून या दुर्बणिीचा पाया हा अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून तयार करण्यात आला आहे. बाहेरील वाऱ्याचा निरीक्षणावर परिणाम होऊ नये म्हणून प्रथमच िवड स्क्रीन बसविण्यात आले आहेत. अशा अनेक गोष्टींचे आरेखन करून पी.पी.एस.ने खगोल शास्त्राच्या संशोधनासाठी त्यांच्या कंपनीचा सहभाग नोंदवला आहे.

Pune model of co-working space From start-ups to large companies everyone is getting preference
को- वर्किंग स्पेसचे पुणेरी मॉडेल! स्टार्टअपपासून मोठ्या कंपन्यांपर्यंत सर्वांचीच मिळतेय पसंती
Apple Company has decided to fires 600 employees in California
‘ॲपल’कडून ६०० कर्मचाऱ्यांना नारळ; कंपनीकडून करोनानंतरची पहिलीच मोठी कर्मचारी कपात
IIIT Pune
आयआयआयटी पुणेमध्ये प्रवेशाच्या जागांमध्ये टप्प्याटप्प्याने वाढ, डॉ. अनिल सहस्रबुद्धे यांच्या उपस्थितीत उद्या पहिला पदवी प्रदान समारंभ
Sensex jump over 500 point to hit
सेन्सेक्सची पाच शतकी दौड