पुणे महापालिकेतर्फे दिला जाणारा बालगंधर्व पुरस्कार यंदा संगीत नाटय़ रंगभूमीवरील गायिका अभिनेत्री डॉ. क्षमा वैद्य यांना जाहीर करण्यात आला आहे. बालगंधर्व रंगमंदिरात २६ जून रोजी हा पुरस्कार प्रदान समारंभ होईल.   
महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. संगीत नाटय़ क्षेत्रातील कलाकाराला प्रतिवर्षी बालगंधर्व पुरस्काराने सन्मानित केले जाते. यंदाच्या पुरस्कारासाठी निवड समितीची बैठक बुधवारी बोलावण्यात आली होती. या समितीने संगीत नाटय़ रंगभूमीवरील गायिका, अभिनेत्री डॉ. वैद्य यांची एकमताने निवड केली. महापौर धनकवडे, स्थायी समितीच्या अध्यक्ष अश्विनी कदम, सभागृहनेता बंडू कमसे, विरोधी पक्षनेता आणि काँग्रेसचे गटनेता अरविंद शिंदे, भाजपचे गटनेता गणेश बीडकर तसेच पुरस्कार निवड समितीचे सदस्य उल्हास पवार, प्रतिभाताई मोडक, शुभांगी दामले, डॉ. सतीश देसाई आणि अनुराधा राजहंस यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती. सन्मानचिन्ह आणि एक्कावन्न हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
बालगंधर्व पुरस्काराबरोबरच सहकलाकारांना दिले जाणारे पाच पुरस्कारही जाहीर करण्यात आले आहेत. सन्मानचिन्ह आणि अकरा हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या पुरस्कारासाठी यंदा अजय धनवडे (रंगभूमी), अपूर्वा भिलारे (पुरुषोत्तम करंडक, दिग्दर्शन), सदाशिव गाडेकर (नेपथ्य), राज कुबेर (दिग्दर्शन) आणि ललिता देसाई (अभिनय) यांची निवड करण्यात आली आहे. पुरस्कार प्रदान कार्यक्रम २६ जून रोजी बालगंधर्व रंगमंदिर येथे सायंकाळी पाच वाजता होईल.

Lata Mangeshkar Award 2024 announced for amitabh bachchan
अमिताभ बच्चन यांना यंदाचा लता मंगेशकर पुरस्कार घोषित; ए.आर. रेहमान, अशोक सराफ, अतुल परचुरे यांना देखील विशेष पुरस्काराने गौरवणार
zee natya gaurav puraskar 2024
मोहन जोशींना यंदाचा ‘झी जीवन गौरव’ पुरस्कार प्रदान! म्हणाले, “आताच्या नव्या पिढीने…”
juna furniture teaser released by salim khan
ज्येष्ठ नागरिकांचा सहानुभूतीने विचार करायला हवा
Devendra Fadnavis after Swatantrya Veer Savarkar
‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट पाहिल्यानंतर फडणवीसांची राहुल गांधींसाठी खास ऑफर; म्हणाले, “मी माझ्या खर्चाने…”