भाजप-शिवसेना सत्तेत एकत्र आहे. मात्र, सतत एकमेकांची उणीदुणी काढत असतात. आरोप-प्रत्यारोपाच्या नादात त्यांचे जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत दोघांनाही युती नको असून युती तोडण्यास दोघेही आतुर आहेत. मात्र, युती कोण तोडतंय एवढाच मुद्दा राहिला आहे, असे भाकीत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांच्याविषयी बोलणे टाळत मंत्र्याने बोलताना भान ठेवले पाहिजे, अशी टिप्पणी त्यांनी केली.

आमदार महेश लांडगे यांनी राष्ट्रवादीचा राजीनामा दिला, याबाबत ते म्हणाले,जे गेले, त्या सर्वाच्या कुंडल्या आपल्याकडे आहेत. काहींचे स्वारस्य टीडीआरमध्येच होते. ते उद्योग थांबव, असे मला सांगावे लागायचे. खेड विमानतळासाठी तीन जागा पाहण्यात आल्या होत्या. काही लोकप्रतिनिधींनी विरोध केल्यामुळे अडचणी आल्या. पालकमंत्री होतो. मात्र, पोलिसी बडगा न दाखवता शेतक ऱ्यांना विश्वासात घेऊनच विमानतळ करायचा होता. खेडला विमानतळ झाला असता, तर सर्वाधिक फायदा िपपरी-चिंचवडला झाला असता. पुरंदर विमानतळाला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव दिले, ते योग्य आहे, असे ते म्हणाले.