07 March 2021

News Flash

वेश्याव्यवसायप्रकरणी इंदापुरातील राष्ट्रवादीच्या नगरसेवकाविरुद्ध गुन्हा

इंदापूरमधील एका लॉजवर ग्रामीण पोलिसांनी छापा टाकून वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांची सुटका केली.

( संग्रहीत छायाचित्र )

इंदापूरमधील एका लॉजवर ग्रामीण पोलिसांनी छापा टाकून वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांची सुटका केली. वेश्याव्यवसायात प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचा नगरसेवक सामील असल्याचे निष्पन्न झाले असून वेश्याव्यवसायास प्रवृत्त केल्याप्रकरणी नगरसेवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी  इंदापूर नगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचा नगरसेवक अनिकेत अरविंद वाघ आणि लॉजचालक अजय बाळसाहेब शिंदे (दोघे रा. इंदापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सजन हंकारे यांनी या संदर्भात इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदापुरातील खडकपुरा भागात असलेल्या रूपाली लॉजवर वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक हंकारे यांना मिळाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचा नगरसेवक- लॉजमालक वाघ आणि लॉजचालक शिंदे हे युवतींना पैशांचे आमिष दाखवून त्यांना वेश्याव्यवसायास प्रवृत्त करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी शहानिशा केली. बनावट ग्राहकाच्या माध्यमातून खातरजमा करण्यात आल्यानंतर शुक्रवारी (६ एप्रिल) पोलिसांनी तेथे  छापा टाकला. पोलीस निरीक्षक हंकारे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक ननावरे, खंडागळे, पोमणे, यांनी ही कारवाई केली. दरम्यान, वेश्याव्यवसायात राष्ट्रवादीचा नगरसेवक सामील असल्याचे उघडकीस आल्यानंतर इंदापुरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. काही वर्षांपूर्वी पुणे पोलिसांनी बाणेर भागातील राष्ट्रवादीच्या नगरसेवकाच्या बंगल्यावर छापा टाकून वेश्याव्यवसायाचे प्रकरण उघडकीस आणले होते. या कारवाईत पोलिसांनी बंगल्यातून युवतींची सुटका केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 8, 2018 5:00 am

Web Title: case file against ncp corporator for prostitution business
Next Stories
1 प्रभाग क्र. २२ च्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीच्या पूजा कोद्रे विजयी
2 अब्रू वाचवण्यासाठी घराच्या गॅलरीतून मारली उडी, मुंबईनंतर पुण्यातील धक्कादायक घटना
3 पुणे महापालिका पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीने गड राखला, पूजा कोद्रे विजयी
Just Now!
X