बांधकाम साईट वरील पाण्याच्या खडड्यात बूडन एका चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. सुमित अनिल चव्हाण अस साडेतीन वर्षाच्या मयत मुलाचं नाव आहे. ही घटना आज सायंकाळी साडेपाच वाजता दिघी येथे घडली. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, अनिल चव्हाण हे दिघीमधील पालांडे नगर येथे एका घराच्या बांधकामाचे प्लास्टर करण्यासाठी गेले होते. सोबत आपल्या साडेतीन वर्षाच्या सुमित या चिमुकल्याला घेऊन गेले होते. दुर्दैव म्हणजे सुमितचे वडील कामात असताना सुमित हा खेळता खेळता तेथीलच एका पाण्याच्या खड्ड्यात सुमित पडला आणि तो जखमी झाला. हे सर्व त्याच्या वडिलांच्या लक्षात आल्यानंतर सुमितला तातडीने जवळच्या स्थानिक रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी त्याला यशवंत चव्हाण स्मृती रुग्णालयात दाखल करण्यास सांगितलं. रुग्णालयात आणेपर्यंत सुमित या साडेतीन वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला होता. त्याला रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर मृत घोषित केलं.