News Flash

इन्स्टाग्रामवर मेसेजकडे दुर्लक्ष, तरुणीला अपहरणाची धमकी

निगडी परिसरात राहणाऱ्या महाविद्यालयीन तरुणीने इन्स्टाग्रामवरील मेसेज न बघितल्याने चिडलेल्या तरुणाने संबंधित तरुणीला अपहरणाची धमकी दिली.

संग्रहित छायाचित्र

इन्स्टाग्रामवर पाठवलेले मेसेज न बघितल्याने चिडलेल्या तरुणाने महाविद्यालयीन तरुणीला अपहरणाची धमकी दिल्याची घटना समोर आली आहे. पुण्यातील निगडी परिसरात ही घटना घडली असून या प्रकरणी अज्ञात विरोधात निगडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडी परिसरात राहणाऱ्या महाविद्यालयीन तरुणीने इन्स्टाग्रामवरील मेसेज न बघितल्याने चिडलेल्या तरुणाने संबंधित तरुणीला अपहरणाची धमकी दिली. हा प्रकार गेल्या महिनाभरापासून सुरू होता. तरुणी सुरुवातीला घाबरली होती. अखेर तिने धाडस दाखवत निगडी पोलिसात फिर्याद दिली आहे. अज्ञात आरोपीने तरुणीच्या इन्स्टाग्रामवर अकाऊंटवर ‘तू माझ्याशी मैत्री करशील का?, मी तुला भेटायला आलोय.तुझा मोबाईल नंबर दे’, अशा आशयाचे मेसेज केले होते. परंतु, तरुणीने याकडे लक्ष दिले नव्हते. याचाच राग मनात धरून आरोपी तरुणाने तरुणीचा त्रास द्यायला सुरुवात केली.’तू मेसेज बघितले नाहीस तर मी तुझे अपहरण करणार’, अशी उघड धमकी त्याने दिली. याप्रकरणी निगडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध घेतला जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 23, 2019 4:03 pm

Web Title: college girl threatened by unknown person on instagram case filed
Next Stories
1 पुण्यात 11 हजार विद्यार्थ्यांकडून मनाच्या श्लोकांचे सामूहिक पठण
2 हिंजवडीतील संगणक अभियंता तरुणीकडे व्हॉट्सअॅपवर अश्लील व्हिडिओची मागणी
3 थकबाकी वसुली न झाल्यास पालिकेचे अंदाजपत्रक कागदावरच!
Just Now!
X