पुणे शहरात दिवसभरात २ हजार ९०० करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर २० रूग्णांचा मृत्यू झाला आहे. शहरातील एकूण बाधितांची संख्या आज अखेर २ लाख ३५ हजार ३९४ झाली आहे. आजपर्यंत ५ हजार ५३ रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. दरम्यान १ हजार २४५ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आजअखेर २ लाख ७ हजार ८१७ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात १ हजार ४१६ तर महानगरपालिकेच्या हद्दीबाहेरील ११ जण करोनाबाधित आढळले आहेत. याशिवाय ७९२ रूग्ण करोनामुक्त देखील झाले आहेत. दिवसभरात दहा रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण बाधितांची संख्या १ लाख २२ हजार ३६५ वर पोहचली आहे. यापैकी १ लाख ९ हजार ५५८ जण करोनातून बरे झाले आहेत. पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १ हजार ८०१ असल्याची माहिती महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

Coronavirus – चिंताजनक: दिवसभरात राज्यात ९९ रूग्णांचा मृत्यू, ३० हजार ५३५ करोनाबाधित वाढले

राज्यात आता करोनाचा पुन्हा एकदा उद्रेक होत असल्याची परिस्थिती दिसत आहे. कारण आता दररोज आढळणाऱ्या नवीन करोनाबाधित रूग्णांबरोबरच मृत्यूंच्या संख्येतही झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. आज दिवसभरात राज्यात ९९ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली असून, ३० हजार ५३५ नवीन करोनाबाधित आढळून आले आहेत. राज्यातील मृत्यू दर २.१५ टक्के एवढा झाला आहे.   आतापर्यंत राज्यात ५३ हजार ३९९ रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. राज्यात आज रोजी एकूण २ लाख १० हजार १२० अॅक्टिव्ह रूग्ण आहेत.