सिंहगड रस्ता परिसरात दहा हजार रुग्ण; वडगाव, माणिकबागेत सर्वाधिक रुग्णसंख्या

पुणे : सिंहगड रस्ता परिसरातील जनता वसाहत, पानमळा, दांडेकर पूल, दत्तवाडी, गांधी वसाहत, हिंगणे, विठ्ठलवाडी, आनंदनगर-माणिकबाग, वडगाव बुद्रुक, धायरी भागात करोनाबाधित रुग्ण मोठय़ा संख्येने आढळून आले आहेत. सिंहगड रस्ता परिसरातील एकू ण करोनाबाधितांच्या संख्येने १० हजारांचा टप्पा गाठला असल्याने सिंहगड रस्ता परिसर करोनामुळे अतिसंक्रमित परिसर ठरला आहे.

करोना संसर्गात सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येत असलेला भाग तिसऱ्या क्रमांकावर आहे. जनता वसाहत, दांडेकर पूल, दत्तवाडी, गांधी वसाहत, हिंगणे, विठ्ठलवाडी, माणिकबाग, आनंदनगर, सनसिटी, गणेशमळा, धायरी, वडगाव बुद्रुक अशा परिसराचा यामध्ये समावेश होत आहे. रविवारी (२७ सप्टेंबर) पर्यंत या भागामध्ये मिळून एकू ण १० हजार २७४ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर २३६ रुग्णांचा करोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. नऊ हजार करोनाबाधित रुग्ण उपचार करून बरे झाले आहेत, अशी माहिती क्षेत्रीय कार्यालयाकडून देण्यात आली.

सिंहगड रस्ता परिसरातील करोनाबाधित रुग्णांसाठी पु. ल. देशपांडे उद्यानातील के ंद्रात, कै . मुरलीधर लागयुडे रुग्णालयात आणि धायरी येथील पोकळे शाळेत चाचण्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यापैकी पु. ल. देशपांडे उद्यानातील के ंद्रात आणि कै . मुरलीधर लायगुडे रुग्णालयातील के ंद्रात प्रतिजन (अँटिजेन) आणि घशातील स्रावाच्या (आरटी-पीसीआर) अशा दोन्ही स्वरूपाच्या चाचण्या होत आहेत. तर धायरी येथील पोकळे शाळेत के वळ प्रतिजन स्वरूपाची चाचणी करण्याची सुविधा सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयाकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे. या तिन्ही के ंद्रांत मिळून दिवसाला दोन्ही प्रकारच्या मिळून तीनशे ते साडेतीनशे चाचण्या होत आहेत.

३ हजार १२० रुग्णांची नोंद

या भागामध्ये सर्वाधिक रुग्णांची नोंद धायरी परिसरात करण्यात आली आहे. या भागात ३ हजार १२० रुग्ण रविवापर्यंत असल्याची नोंद क्षेत्रीय कार्यालयाकडे आहे. वडगाव बुद्रुक परिसरात १ हजार ९५०, आनंदनगर-माणिकबाग परिसरात १ हजार ७७१ रुग्ण आढळून आले आहेत. विठ्ठलवाडी येथे ९८८, जनता वसाहत परिसरात ८८१, दांडेकर पूल परिसरात ३१९, दत्तवाडीमध्ये ४८८, गणेशमळा परिसरात ३०५, हिंगण्यात ११६, गांधी वसाहत परिसरात ७१, पानमळ्यामध्ये २४७ रुग्ण असून सिंहगड रस्त्याच्या अन्य भागात १८ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असली, तरी या भागातील नऊ हजार रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. रविवापर्यंत या परिसरात १ हजार ३८ सक्रिय बाधित रुग्णसंख्येची नोंद क्षेत्रीय कार्यालयाकडे करण्यात आली आहे.