News Flash

Coronavirus: पुण्यातील अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्याला करोनाची लागण

या कर्मचाऱ्याला श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्याची करोनाची चाचणी करण्यात आली होती.

प्रातिनिधिक फोटो

करोना योद्धे असलेल्या डॉक्टर, नर्स, पोलीस, पत्रकार यानंतर आता अग्निशमन जवानांमध्येही करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलात यामुळे खळबळ उडाली आहे.

पुणे महापालिकेच्या अग्निशामक विभागातील ५० वर्षीय बंब चालकाला करोनाची लागण झाली आहे. या कर्मचाऱ्याला श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्याची करोनाची चाचणी करण्यात आली होती. त्यानंतर याचा अहवाल आल्यानंतर त्यात तो करोनाबाधित असल्याचे निष्पन्न झालं.

अग्निशामनच्या या कर्मचार्‍यावर उपचार सुरु असून हा कर्मचारी ज्यांच्या संपर्कात आला आहे त्यांची माहिती घेतली जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 8, 2020 6:08 pm

Web Title: coronavirus infection in pune fire department personnel aau 85 svk 88
टॅग : Coronavirus
Next Stories
1 Lockdown: नाकाबंदीदरम्यान दुखापत होऊनही ‘ती’ ऑनड्युटी
2 Lockdown: येत्या शैक्षणिक वर्षासाठी शाळांची फी वाढ नाही; राज्य शासनाचा पालकांना दिलासा
3 राज्यात १० वर्षांखालील ५५५ मुलांना लागण
Just Now!
X