27 February 2021

News Flash

Coronavirus: पुढील काही दिवस पुण्यातील सर्व हॉटेल आणि सलूनही राहणार बंद

करोनामुळे पुण्यामध्ये हजामतही बंद

पुण्यात आणखीन एका महिलेला करोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर आज (बुधवारी) समोर आली आहे. त्यामुळे पुण्यातील करोनाग्रस्त रूग्णांची संख्या १८ वर पोहोचली आहे. पुण्यामध्ये करोनाच्या रुग्णांची वाढली संख्या लक्षात घेत दुकानदारांनी दोन दिवस दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. करोनामुळे पुणे व्यापारी महासंघाकडून मंगळवार (१७ मार्च) ते गुरुवापर्यंत (१९ मार्च) व्यापार बंद ठेवण्याचा निर्णय सोमवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. शहरातील घाऊक तसेच किरकोळ व्यापाऱ्यांकडून स्वयंस्फूर्तीने बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात आला असून शहरातील चाळीस हजार दुकाने  बंद राहणार आहेत. मात्र आता यामध्ये हॉटेल्स आणि सलूनचाही समावेश झाला आहे.

सलून बंद

व्यापाऱ्यांपाठोपाठ आता पुणे शहरातील सलून मालकांनी दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळेच शहरामधील सलूनची दुकाने पुढील काही दिवस बंद ठेवणार असल्याचे सलून मालकांनी स्पष्ट केलं आहे. शुक्रवारपर्यंत शहरामधील सर्वच सलूनची दुकाने बंद राहणार आहेत.

पुण्यामध्ये हॉटेल्सही बंद

पुण्यामधील हॉटेल मालकांनाही मंगळवारपासून पुढील काही दिवस हॉटेल बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शहरातील अनेक बडी हॉटेल्स बंद ठेवण्यात येणार आहेत. करोनाचा वाढता प्रादूर्भाव पाहता पुणेकरांनाही घराच राहणे पसंत केलं आहे.

दुकाने बंद

शहरात ३५ ते ४० हजार छोटे-मोठे व्यापारी असून सुमारे ७० ते ८० हजार कामगार, सेवकवर्ग या दुकानातून काम करतात. पुणेकरांना करोना विषाणूचा संसर्ग होऊ  नये या उद्देशातून स्वत:च्या आर्थिक नुकसानीपेक्षा पुणेकरांच्या जीवाची काळजी घेणे ही भावना व्यापारी वर्गाच्या मनात असल्याने सरकारी आदेश येण्याआधीच व्यापारी संघटनांनी स्वत:च दुकाने काही दिवस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे व्यापारी महासंघाच्या गुरुवारी (१९ मार्च) होणाऱ्या कार्यकारिणी सभेत संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्यण घेण्यात येणार असल्याची माहिती पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी दिली आहे.

शुकशुकाट

दरम्यान, पुणे शहरातील बहुतांश भागातील दुकाने बंद असल्याने शहरातील रविवार पेठ, बोहरी आळी, लक्ष्मी रस्ता, तुळशीबाग, महात्मा फुले मंडई, शनिपार,अप्पा बळवंत चौक, फडके हौद चौक, भवानी पेठेतील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवल्याने नेहमी गजबजलेल्या या भागामध्ये मंगळवारपासूनच शुकशुकाट पाहायला मिळत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 18, 2020 12:37 pm

Web Title: coronavirus pune salon and hotels to remain close for next few days scsg 91
Next Stories
1 Coronavirus: एरव्ही उभं राहण्यासाठी जागा नसणाऱ्या डेक्कन क्वीन आणि सिंहगड एक्सप्रेसमध्ये शुकशुकाट
2 पुण्यात आणखी एकाला करोनाची लागण
3 व्यापाऱ्यांचा बंद; बाजारात शुकशुकाट
Just Now!
X