गायीचे दूध सोमवारपासून (१६ डिसेंबर) लिटरमागे दोन रुपयांनी महागणार आहे. दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाने याबाबतचा निर्णय शनिवारी घेतला. दरम्यान, म्हशीच्या दुधात कोणत्याही प्रकारची वाढ करण्यात आलेली नाही. विक्री दरात दोन रुपयांनी वाढ करतानाच शेतकऱ्यांकडून दूध खरेदी करताना लिटरमागे एक रुपयांची वाढ करण्यात येणार आहे. दूध खरेदी विक्रीच्या दराचा आढावा घेण्यासाठी सहकारी व खासगी दूध व्यावसायिकांच्या दूध उत्पादक व प्रक्रिया कल्याणकारी संघाची सभा शनिवारी पुण्यात कात्रज डेअरी येथे झाली.