20 January 2021

News Flash

इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून पडून एकाचा मृत्यू

मांडलिक आगाळे यांनी आत्महत्या केली का? याचा तपास पोलिसांकडून सुरु

पाचव्या मजल्यावरून पडून पिंपरीत एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे

पिंपरी चिंचवडमधील विठ्ठल नगर भागात पुनर्वसन इमारतीच्या पाचव्या मजल्यावरुन खाली पडून एकाचा मृत्यू झाला आहे. ही घटना रात्री ८ च्या सुमारास घडली आहे. मंडलिक आगाळे असे मृत्यू झालेल्या माणसाचे नाव आहे. ते दारुच्या नशेत सोमवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास इमारत क्रमांक १२ च्या पाचव्या मजल्यावरुन खाली पडले.

मांडलिक आगाळे हे आपल्या बहिणीकडे आले होते. ते उस्मानाबादमध्ये वास्तव्य करत होते. मात्र पिंपरीत बहिणीच्या घरी आले असता त्यांचा इमारतीच्या पाचव्या मजल्यावरुन खाली पडून मृत्यू झाला. घरात कोणीही नसताना ही घटना घडली आहे. त्यामुळे आगाळे यांनी आत्महत्या केली आहे? की दारुच्या नशेत ते खाली कोसळले आहेत हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मंडलिक आगाळे यांच्या वडिलांवर यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी आता पिंपरी पोलीस अधिक तपास करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 19, 2017 10:58 pm

Web Title: death of one after falling from the fifth floor of the building
Next Stories
1 ‘पीएमआरडीए’चा विकास आराखडा एका वर्षात पूर्ण करणार : गिरीश बापट
2 मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर कारची ट्रकला धडक, दोन गंभीर जखमी
3 मैत्रीतील अबोल्यातून तरुणीवर ब्लेडने वार
Just Now!
X