28 November 2020

News Flash

शिवरायांच्या जयघोषाने रायगड दुमदुमला

शिवाजी महाराजांच्या ३३३ व्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

| April 27, 2013 02:10 am

शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, हर हर महादेवच्या जयघोषात रायगडचा कानाकोपरा दुमदुमुन गेला.. निमित्त होते शिवाजी महाराजांच्या ३३३ व्या पुण्यतिथीचे.
श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाच्या वतीने यानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. विधानपरिषेदतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे, आमदार भरत गोगावले, विनायक मेटे, रायगड किल्ला परिषदेच्या अध्यक्षा वर्षां गायकवाड, भोसले घराण्याचे वंशज श्रीमंत शिवाजीराव भोसले, इतिहासाचे अभ्यासक पांडुरंग बालकवडे या प्रसंगी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरवात जगदीश्वर मंदिरातील पूजनाने आणि हनुमान जयंती उत्सवाने झाली. राजदरबारात झालेल्या कार्यक्रमात ‘शिवराज मुद्रा’ या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. तसेच शिवकथाकार विजयराव देशमुख यांना ‘श्री शिवपुण्यस्मृती रायगड पुरस्कार’ ने सन्मानित करण्यात आले. मुख्य कार्यक्रमानंतर राजदरबारापासून बाजारपेठेपर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणूकीत तुताऱ्या, सनई-चौघडा, संबळ वादन, भगवे ध्वज, पताका आणि अबदागिरी घेतलेले युवक मोठय़ा प्रमाणात सहभागी झाले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 27, 2013 2:10 am

Web Title: different cutural programmes at raigad on the eve of 333rd anniversary of shivajiraje
टॅग Raigad
Next Stories
1 बारावीचा निकाल वेळेतच लागणार – राजेंद्र दर्डा
2 एलबीटीची नोंदणी चार दिवसात न करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई – पिंपरीच्या आयुक्तांचा इशारा
3 आठ हजार हरकती दाखल; शासनाची २६ जूनपर्यंत मुदत
Just Now!
X