गेल्या वर्षी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना पुस्तके  नाहीत, परीक्षेची स्पष्टता नाही

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुक्त अध्ययन प्रशाळा या विभागातर्फे  दूरशिक्षण अभ्यासक्रमाला गेल्या वर्षी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना अजूनही अभ्यास साहित्य मिळाले नसल्याचे समोर आले आहे. तसेच पहिल्या वर्षांच्या परीक्षांबाबत विभागाने स्पष्ट

के लेले नाही. त्यामुळे पहिल्या वर्षांच्या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी मुक्त शिक्षण प्रशाळा विभागाच्या कारभाराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित के ले आहे.

गेल्या वर्षी मुक्त अध्ययन प्रशाळा विभागातर्फे  दूरशिक्षणाची प्रवेश प्रक्रिया नोव्हेंबपर्यंत सुरू होती. त्यानंतर अभ्यास के ंद्रावर अध्यापन होईल, अभ्यासासाठीचे साहित्य दिले जाईल असे सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात अभ्यासक्रमाची ओळख करून देणारे एकच सत्र झाले, तर आतापर्यंत पुस्तके , अभ्यास साहित्य देण्यात आलेले नाही. पहिल्या वर्षांच्या परीक्षाही झालेल्या नाहीत. अंतर्गत मूल्यमापनासाठी चाचणी, प्रकल्प असेही काही झालेले नाही. मात्र आता दुसऱ्या वर्षांची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पहिल्या वर्षांच्या परीक्षा सप्टेंबरमध्ये होणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र त्याबाबतचे परिपत्रक प्रसिद्ध के लेले नाही. मात्र ३० सप्टेंबपर्यंत द्वितीय वर्षांचे प्रवेश घेण्याची सूचना देण्यात आल्याचे या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी पहिल्या वर्षांचा प्रवेश घेऊन शुल्क भरले आहे. पण अभ्यास साहित्यही मिळालेले नाही, परीक्षांची माहिती नाही, मग पहिल्या वर्षांच्या भरलेल्या हजारो रुपये शुल्काचा उपयोग काय, असा सवालही विद्यार्थ्यांनी उपस्थित के ला आहे.

दूरशिक्षण अभ्यासक्रमाचे पहिलेच वर्ष असल्याने प्रवेश प्रक्रिया उशिरापर्यंत चालली. विद्यार्थीसंख्या निश्चित होणे हा महत्त्वाचा भाग असल्याने अभ्यास साहित्य उपलब्ध करण्यास वेळ लागला. करोना संसर्गामुळे अभ्यास साहित्याचे वाटप करता आले नाही. अभ्यास साहित्य वाटपासाठी केंद्रावर पाठवून विद्यार्थ्यांची गर्दी झाल्यास, काय करायचे असा प्रश्न आहे. विद्यार्थ्यांना अभ्यास साहित्य ऑनलाइन उपलब्ध करून दिले आहे. त्याबाबत विद्यार्थ्यांना कळवलेले आहे. विद्यार्थ्यांच्या शंका-प्रश्न सोडवण्यासाठी विभागाच्या संके तस्थळावर ऑनलाइन व्यवस्था करण्यात आली आहे. अंतर्गत मूल्यमापनासाठीची तयारी के ली आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने ऑनलाइन पद्धतीने ही प्रक्रिया राबवली जाईल. आधी एमबीए, पदव्युत्तर अभ्यासक्रमाची परीक्षा घेतली जाणार आहे. प्रथम वर्षांची गुणपत्रिका न मागता द्वितीय वर्षांची प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही.

– डॉ. संजीव सोनावणे, संचालक, मुक्त अध्ययन प्रशाळा