पुणे : पुणे, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्य़ातील ४६३ रुग्णालयांना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून एकू ण ४ हजार २०० रेमडेसिविर इंजेक्शन रविवारी वितरित करण्यात आली. रेमडेसिविर वितरित करण्यात आलेल्या रुग्णालयांची यादी आणि इंजेक्शनच्या संख्येची यादी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी रविवारी जाहीर के ली.

रुग्णालयातील खाटांच्या क्षमतेनुसार हा पुरवठा करण्यात आला आहे. रेमडेसिविरचा साठा औषध पुरवठादारांना देण्यात आला असून रुग्णालयांनी राज्य शासनाने निश्चित के लेल्या दराने त्याची खरेदी करावी, खरेदी प्रक्रियेत दिरंगाई, टाळाटाळ करू नये, असे डॉ. देशमुख यांनी याबाबतच्या आदेशात नमूद के ले आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड, कॅ न्टोन्मेंट, जिल्ह्य़ातील रुग्णालयांना रेमडेसिविरचा पुरवठा करण्यात आला आहे.

करोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी रुग्णालयांकडून रेमडेसिविरसाठी रुग्णांच्या नातेवाइकांना सक्ती के ली जात असल्याचे पुढे आले होते. त्यातून रेमडेसिविरचा काळाबाजार होत असल्याचेही पुढे आले होते. मात्र गेल्या दोन आठवडय़ांपासून जिल्हाधिकारी कार्यालयाकडून रुग्णालयांना रेमडेसिविरचे वितरण करण्यात येत आहे. त्यानुसार पुणे, पिंपरी-चिंचवडसह जिल्हा आणि कॅन्टोन्मेंटमधील ४६३ रुग्णालयांना एकू ण ४ हजार २०० रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करून देण्यात आली आहेत.