News Flash

निवडणुकांच्या तोंडावर भूमिपूजन, उद्घाटनांचा धडाका

पालिकेच्या पंचवार्षिक निवडणुका फेब्रुवारी २०२२ मध्ये होण्याची शक्यता आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील बहुतांश प्रभागांमध्ये भूमिपूजन, उद्घाटनांचे कार्यक्रम सध्या होताना दिसत आहेत.

 

पिंपरी : पिंपरी पालिकेच्या निवडणुका वर्षभरावर आल्याने प्रत्येक प्रभागात ‘सर्वपक्षीय’ नगरसेवकांचा भूमिंीपूजन व उद्घाटनांच्या कार्यक्रमांचा धडाका सुरू झाला आहे. आपण किती ‘कार्यक्षम’ आहोत, हेच दाखवण्याचा प्रयत्ना यातून दिसून येतो. चार सदस्यीय प्रभागातील चारही नगरसेवकांचे आपआपसात पटत नसल्याचे चित्र बहुतांश ठिकाणी आहे. त्यामुळे प्रभागातील कामे करताना अधिकारी व ठेकेदारांची पंचाईत होत आहे.

पालिकेच्या पंचवार्षिक निवडणुका फेब्रुवारी २०२२ मध्ये होण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने राजकीय पक्षांची आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. विद्यमान नगरसेवक आपआपल्या प्रभागात यापूर्वीच कामाला लागले आहेत. पुन्हा निवडून येण्यासाठी पाच वर्षांत केलेली कामे मतदारांना सांगावी लागणार आहेत. त्यामुळेच आतापर्यंत पूर्ण झालेल्या कामांची उद््घाटने आणि नव्याने सुरू होणाऱ्या कामांची भूमिपूजने करण्याचा धडाका सुरू आहे. निवडणुकीत दिलेली आश्वासने पूर्ण झाली पाहिजे, प्रभागाच्या दृष्टीने महत्त्वाचे असणारे प्रश्न आतातरी सुटले पाहिजेत याकडे नगरसेवकांचा कल आहे. प्रशासकीय पातळीवरील अनास्था तथा स्थानिक पातळीवरील विशिष्ट कारणांमुळे रखडलेली कामे मार्गी लावण्याचा तगादा नगरसेवकांनी लावला आहे. नगरसेवकांमध्ये आपापसात पटत नाही, त्यामुळे अनेक प्रश्न नव्याने निर्माण होतात, अशी स्थिती बहुतांश ठिकाणी आहे. अशावेळी त्यांच्यात समन्वय साधून प्रभागातील कामांना चालना देण्यासाठी अधिकारी तसेच ठेकेदारांची बऱ्यापैकी दमछाक होत असल्याचे स्पष्टपणे दिसते.

भूमिपूजन, उद्घाटने करण्यामागे नगरसेवकांमध्ये चढाओढ किंवा श्रेय घेण्याची धडपड नसते. तर, नागरिकांच्या दृष्टीने उपयुक्त असलेल्या सुविधा लवकर उपलब्ध करून देण्याचा प्रयत्ना त्यामागे असतो. एकाच प्रभागातील चार नगरसेवकांची वेगवेगळी मते असू शकतात. त्याला वाद असे म्हणता येणार नाही. – नामदेव ढाके, सत्तारूढ पक्षनेता, पिंपरी पालिका

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 22, 2021 12:47 am

Web Title: election bhumipujana inauguration akp 94
Next Stories
1 शहराच्या वाढीव पाण्याबाबत निर्णयाची शक्यता
2 उजनी जलाशयावर पक्षी निरीक्षकांना ‘मोरघारां’ची भुरळ
3 विकासाचे नाव, सुविधांचा अभाव
Just Now!
X