19 February 2019

News Flash

खाद्यसंस्कृतीचा माहितीकोश खवय्यांच्या भेटीस!

शाकाहारी पाककृतींबरोबरच यंदा मांसाहारी पाककृतींची चमचमीत मेजवानी अंकात मिळणार आहे.

‘लोकसत्ता पूर्णब्रह्म’च्या निमित्ताने बुधवारी पुण्यात कार्यक्रम

महाराष्ट्रातील रसरशीत पाककृती म्हणजे मराठी संस्कृतीला समृद्ध करणारा खाद्यखजिनाच. राज्यात मैलोन्गणिक खाद्यसंस्कृती बदलते. या सगळ्याचा आढावा घेणाऱ्या, राज्याच्या वैविध्यपूर्ण खाद्यपदार्थाची ओळख करून देणाऱ्या ‘पितांबरी रुचियाना गूळ’ प्रस्तुत ‘लोकसत्ता पूर्णब्रह्म-२०१७’ या विशेषांकाचे प्रकाशन नुकतेच मुंबईत झाले. त्यानिमित्ताने बुधवार, २ ऑगस्ट रोजी टिळक स्मारक मंदिर येथे सायंकाळी ५.३० वाजता एक खास कार्यक्रम होणार असून, या वेळी प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर उपस्थित राहणार आहेत.

‘लोकसत्ता पूर्णब्रह्म’चा हा चौथा वार्षिकांक आहे. त्यात राज्यातील विविध भागांच्या वैविध्यपूर्ण खाद्यसंस्कृतीची रसदार ओळख करून देणाऱ्या पाककृती आहेत. शाकाहारी पाककृतींबरोबरच यंदा मांसाहारी पाककृतींची चमचमीत मेजवानी अंकात मिळणार आहे. यंदाच्या अंकातील मानकरी आहेत, प्रसिद्ध पाककृतीतज्ज्ञ उषा पुरोहित, कल्पना तळपदे, शुभा प्रभू-साटम, अलका फडणीस, दीपा पाटील, रचना पाटील आणि ज्योती चौधरी-मलिक. पुण्यात होणाऱ्या कार्यक्रमात उषा पुरोहित, अलका फडणीस, रचना पाटील आणि शुभा प्रभू-साटम यांच्याशी खुमासदार शैलीत गप्पा मारतील शेफ विष्णू मनोहर.  हा कार्यक्रम सर्वासाठी खुला असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य दिले जाणार आहे.

काय? लोकसत्ता ‘पूर्णब्रह्म’च्या प्रकाशनानिमित्त कार्यक्रम

कधी? बुधवार २ ऑगस्ट,

सायं. ५.३०

कुठे टिळक स्मारक मंदिर, टिळक रोड, सदाशिव पेठ, पुणे

First Published on July 31, 2017 1:16 am

Web Title: event in pune on occasion of loksatta purna brahma published