महाराष्ट्रात सध्या होर्डिंगवरून राजकारण पहायला मिळत आहे. या होर्डिंगवरून दिग्गज राजकारण्यांना ट्रोल करण्यात येत आहे. काही दिवसांपुर्वी काँग्रेसच्या छत्री दुरुस्ती उपक्रमाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत होती. सोशल मीडियावर त्यांच्या होर्डींगचा फोटोही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. दरम्यान, विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ट्रोल करण्यात येत आहे.

पुण्यात देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे मोठे होर्डिंग लावण्यात आले आहेत. त्यातील एका होर्डिंगवर नव्या पुण्याचे शिल्पकार, म्हणून फडणवीस यांच्या नावाचा उल्लेख केला आहे. त्यामुळे फडणवीस यांच्यावर टीका होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विट करत फडणवीसांवर निशाणा साधला आहे.

thane, Jitendra Awhad, mumbai High Court, quash the FIR
गुन्हा रद्द करण्यासाठी जितेंद्र आव्हाड उच्च न्यायालयात
On the occasion of Prime Minister Narendra Modi visit to Kanhan Nagpur police force on high alert mode Nagpur
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा: नागपूर पोलीस ‘हाय अलर्ट मोड’वर; वाहतुक बदल जाणून घ्या…
Arvind Kejriwal
अरविंद केजरीवाल तुरुंगात असूनही मुख्यमंत्रीपदी कायम राहू शकतात? उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल
Assembly Speaker Rahul Narvekars letter to Chief Minister to Change the name of Alibaug
अलिबागचे नाव बदला, विधानसभा अध्यक्षांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

अमोल मिटकरी म्हणाले, “आता कमाल झाली. चक्क पुण्याचे शिल्पकार.. मला वाटतं यापेक्षा दुसरा मोठा जोक असू शकत नाही. धन्य ते नेतृत्व आणि धन्य त्यांचे अंधभक्त”


दरम्यान, नेटकऱ्यांनी ट्विटरवर  या होर्डिंगचा चांगलाच समाचार घेतला आहे. एका युझर्सने लिहले आहे की, “पुण्य नगरीसाठी शुन्य नेतृत्व आहे, महापौरांनी बॅनरबाजीसाठी वेगळचं बजेट काढलेलं दिसतय, तयारी महानगरपालिकेची” तर एकाने लिहले आहे की, “पोस्टर बघून फडणवीसांनाही हसू येत आहे”

तर एकीकडे देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवशी जाहिरात, होर्डिंग, उत्सव नको, सेवाकार्यात अधिकाधिक योगदान देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र पक्षाच्या आदेशाआधीचं वाढदिवसाचे होर्डिंग लावण्यात आले आहेत. देवेंद्र फडणवीस यांचा २२ जुलै रोजी वाढदिवस आहे. यानिमित्ताने पक्षाचे कोणतेही नेते/कार्यकर्ते होर्डिंग, बॅनर लावणार नाहीत आणि वृत्तपत्रातून/ टीव्ही माध्यमातून जाहिराती प्रसिद्ध करणार नाहीत, असे आवाहन भाजपाचे कार्यालय सचिव मुकुंद कुळकर्णी यांनी केले आहे.

कारवाई होणार का?

होर्डिंग, बॅनर, जाहिराती असे कुणी केल्यास त्याची पक्षातर्फे गंभीर दखल घेतली जाईल. त्यामुळे या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. यंदा करोनामुळे आपण सारेच अनेक संकटांना तोंड देत आहोत. त्यामुळे ज्या कुणाला योगदान द्यायचे आहे, त्यांनी सेवाकार्यात योगदान द्यावे, असे आवाहन सुद्धा पक्षातर्फे करण्यात येत आहे. त्यामुळे पुण्यात होर्डिंग लावणाऱ्या नेत्यांवर कारवाई होणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.