29 September 2020

News Flash

सुनेने दारू आणून दिली नाही, सासरच्यांनी केला हत्येचा प्रयत्न

अनिता संतोष चौधरी यांच्या पतीचे काही वर्षांपूर्वी मुंबईत अपघातात निधन झाले आहे. त्यांना एक मुलगा असून त्या सासरी राहतात.

(संग्रहित छायाचित्र)

दारू आणून दिली नाही म्हणून सासऱ्याने सुनेला शिवीगाळ करत घरातील अन्य सदस्यांच्या मदतीने कीटकनाशक पाजून हत्येचा प्रयत्न केल्याची घटना आळंदीत घडली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असला तरी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

फिर्यादी अनिता संतोष चौधरी यांच्या पतीचे काही वर्षांपूर्वी मुंबईत अपघातात निधन झाले आहे. त्यांना एक मुलगा असून त्या सासरी राहतात. अनिता व सासरच्यांमध्ये जमिनीचा वाद सुरु असल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. या वादातूनच सासरची मंडळी त्रास देतात, असे तक्रारदार महिलेने म्हटले आहे. सासरे बाळू चौधरी यांनी सुनेला चक्क दारू आणायला सांगितली, त्यास सुनेने नकार दिल्याने बाळू चौधरी यांनी पत्नीसह दोन मुलींना सोबत घेऊन सुनेला दमदाटी,शिवीगाळ करत विषारी कीटक नाशक पाजून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी आळंदी पोलीस अधिक तपास करत आहे. बाळू बाबू चौधरी (सासरे), चंपा चौधरी (सासू), सुरेखा बबन वाघोले (नंदन), रेखा दादा गव्हाणे (नंदन) सर्व रा.गोलेगाव ता.खेड जि. पुणे यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2019 1:52 pm

Web Title: family attempt to murder of daughter in law in alandi
Next Stories
1 पुणे: युट्यूब पाहून छापल्या बनावट नोटा, युवकाला अटक
2 विद्यापीठाच्या ‘नाटय़ाचार्य खाडिलकर’ पारितोषिकासाठी एकही अर्ज नाही
3 शाळा, महाविद्यालयांबाहेर गुटख्याची विक्री
Just Now!
X