पुणे येथील प्रसिद्ध गोल्डमॅन व उद्योजक सम्राट मोझे यांचे आज शहरातील सह्याद्री रुग्णालयात हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं. मागील आठवड्यातच त्यांनी आपला ३९ वा वाढदिवस साजरा केला होता.
सम्राट मोझे हे दररोज अंगावर जवळपास साडेआठ किलो सोनं घालत होते. मनसेचे दिवंगत आमदार रमेश वांजळे यांचा सोनं घालण्याचा विक्रम देखील मोझे यांनी मोडला असल्याचे बोलले जात होते.
बनावट फेसबुक अकाउंटद्वारे आपली बदनामी केली जात असल्याची तक्रार सम्राट मोझे यांनी सायबर पोलीस सेलला तक्रार केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुणे मनपा निवडणूक लढवण्याची त्यांनी मुलाखतही दिली होती. पुण्यातील संगमवाडीच्या प्रभाग क्र. एक मधून ते निवडणूक लढवणार होते. चुलते व माजी आमदार रामभाऊ मोझे यांच्याकडून त्यांना राजकीय वारसा लाभला होता.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 6, 2020 12:51 pm