चिंचवडच्या पुनरूत्थान समरसता गुरूकुलमच्या वतीने १४ व १५ फेब्रुवारीला ‘एकादश प्रारंभ सिंहावलोकन महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची महोत्सवातील दुसऱ्या दिवशी उपस्थिती राहणार आहे.
‘गुरुकुलम’चे प्रमुख गिरीश प्रभुणे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. रविवारी (१४ फेब्रुवारी) दुपारी तीन वाजता  ‘भारतीय पारंपरिक शिक्षण, गुरुकुल पद्धती; वर्तमान दृष्टी’ या विषयावर चर्चासत्र होणार असून शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. या वेळी डॉ. नरेंद्र जाधव, डॉ. प्रभाकर मांडे, मुकुल कानिटकर, रवींद्र शर्मा, इंदुमती काटदरे, महेश शर्मा, डॉ. विजय भटकर, विश्वेश्वरशास्त्री द्रविड, डॉ. वामनराव गोगटे, अनिरूध्द देशपांडे, डॉ. रमेश पानसे, रेणू दांडेकर, डॉ. गिरीश बापट, डॉ. यशवंत पाठक, डॉ. विनय सहस्रबुध्दे, रमेश पतंगे, भीमराव गस्ती, सुनील देशपांडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सोमवारी (१५ फेब्रुवारी) सकाळी गुरूकुल अवलोकन, विद्यार्थी-शिक्षक संवाद, शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांशी संवादाचा कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी सहा वाजता रामकृष्ण मोरे नाटय़गृहात सरसंघचालक मार्गदर्शन करणार आहेत. या वेळी शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा सत्कार भागवतांच्या हस्ते होणार आहे.