प्रशासनाकडे इंजेक्शनचा पुरेसा साठा

पुणे : म्युकोरमायकोसिसच्या भीतीमुळे पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागातील विविध खासगी व सरकारी रुग्णालयांमधून रेमडेसिविर इंजेक्शनची मागणी होत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे प्रशासनाकडे पुरेशा प्रमाणात इंजेक्शन उपलब्ध आहेत. रुग्णालये आणि रुग्णांच्या नातेवाईकांकडून आपापल्या रुग्णांना रेमडेसिविर न देताच उपचार करण्याची मागणी पुढे येत आहे.

म्युकोरमायकोसिस हा बुरशीजन्य आजार करोना रुग्णांवर उपचार करताना देण्यात येणाऱ्या स्टेरॉइडच्या विविध औषधांच्या अतिवापराने होत असल्याचे समोर आले आहे. करोनाबाधितांवर रेमडेसिविर व स्टेरॉइडचा वापर करण्यात येतो. मात्र, रुग्णांना मधुमेह, कर्करोगासारख्या इतर व्याधी असल्यास करोनावरील उपचार करताना दिलेल्या या औधषांच्या अतिवापराने म्युकोरमायकोसिसचा धोका असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे पुण्यात रेमडेसिविरला असणारी मागणी अत्यल्प असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

दरम्यान, शहरासह जिल्ह्यात एक लाखांपेक्षा अधिक सक्रिय रुग्णसंख्या असताना रेमडेसिविरची मागणी प्रचंड वाढली होती. या इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत असल्याच्या तक्रारी सातत्याने प्रशासनाकडे येत होत्या. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी रेमडेसिविरची किरकोळ विक्री बंद के ली आणि या इंजेक्शनचे वाटप रुग्णालयांनी के लेल्या मागणीनुसार थेट जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सुरू के ले. राज्य शासनाकडून प्राप्त झालेले इंजेक्शन खासगी रुग्णालयांमधील प्राणवायू व कृत्रिम श्वसन यंत्रणेच्या (व्हेंटिलेटर) एकू ण खाटांपैकी ६० टक्के  यानुसार इंजेक्शनचे वाटप करण्यात येत आहे.

जिल्हा प्रशासनाचे निरीक्षण

गेल्या काही दिवसांपासून शहरासह जिल्ह्यातील रेमडेसिविर इंजेक्शनची मागणी कमालीची घटली आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड शहरांमधील रुग्णसंख्या आटोक्यात आली असल्याचे एक कारण असून म्युकोरमायकोसिसचा धसकाही रुग्णांचे नातेवाईक आणि रुग्णालयांनी घेतला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून रुग्णालयांना मागणीनुसार इंजेक्शनचे वाटप करण्यात येत असले, तरी इतर व्याधी असणाऱ्या करोना रुग्णांना त्यांचे नातेवाइक रेमडेसिविर देण्यास नकार देत आहेत.

काय आहे हा आजार

म्युकोरमायकोसिसमध्ये नाकाच्या बाजूला असलेल्या हाडाच्या मोकळ्या जागेत (सायनस) या बुरशीची वाढ होते. करोनात रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्याने ही बुरशी वेगाने वाढते व तिचा प्रसार डोळे, मेंदूपर्यंत पोहोचतो. नाक सतत वाहत राहते, नाक सुन्न झाल्यासारखे वाटणे, डोळ्यांतून सतत पाणी येणे, डोळे लाल होणे व सूज येणे, दृष्टी अधू होणे, डोळ्यांपुढे दोन प्रतिमा दिसणे, गाल दुखणे किं वा सूज येणे, दात हलू लागणे ही या आजाराची प्राथमिक लक्षणे आहेत.