हिंजवडी येथील माणमध्ये हेड लाईट आणि टेल लाईट तयार करणाऱ्या कंपनीला भीषण आग. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीविहितहानी झालेली नाही. तिसऱ्या शिफ्टमध्ये रात्रपाळीने काम करणारे शंभर कामगार वेळीच बाहेर पडल्याने बचावले आहेत. ही आग पहाटे चार वाजताच्या सुमारास हिंजवडी माणमधील वेरॉक लाईटिंग सिस्टिम कंपनीला लागली होती. घ

टनेची माहिती मिळताच पुणे आणि पिंपरी-चिंचवड अग्निशमन दल घटनास्थळी दाखलं झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ आग आटोक्यात आणली. ही आग शॉटसर्किटमुळे लागली असल्याचं अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

अग्निशमन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडीमधील वेरॉक लाईटिंग सिस्टिम कंपनी ला आज पहाटे चार च्या सुमारास भीषण आग लागली होती. यात प्लास्टिक आणि थिनर या रसायनाचा जास्त वापर होत असल्याने आग मोठ्या प्रमाणावर पसरली होती. जेव्हा आग लागली तेव्हा तिसऱ्या शिफ्टमध्ये काम करणारे शंभर कामगार कंपनीत काम करत होते. ते सर्व वेळीच बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला. दरम्यान, प्रत्येक्ष दर्शी कामगाराने ही आग शॉर्टसर्किटमुळे स्टोअरमध्ये लागली त्यानंतर अवघ्या कंपनीत आग पसरली असे अधिकारी म्हणाले. पिंपरी-चिंचवड (राहटणी), हिंजवडी एमआयडीसी, पुणे (पीएमआरडीए) आणि खासगी टँकर च्या साहाय्याने तब्बल चार तास अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांनी यश आले. या घटनेत जीविहितहानी झालेली नाही. घटनास्थळी हिंजवडी पोलीस देखील उपस्थित होते.