प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत आज पुण्यातील येरवडा कारागृहामधील ऐतिहासिक वास्तु या जेल पर्यटन म्हणून राज्य सरकारने घोषित केल्या आहेत. त्याचा शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला. या निमित्ताने येरवडा भागातील गेनबा सोपनराव मोझे संस्थेतील दहा विद्यार्थ्यांची पाहणी करण्यासाठी निवड करण्यात आली होती. सहभागी झालेल्या एका विद्यार्थिनीशी अजित पवार यांनी संवाद साधला. “तुझं नाव काय, कितवीला आहेस, त्यावर माझ नाव आयुषा शिर्के असून दादा, मी दहावीमध्ये आहे. हे वर्ष महत्वाचे असून चांगला अभ्यास करण्याचा सल्ला देखील अजित पवार यांनी दिला.”

पुण्यातील येरवडा कारागृहमधील ज्या ठिकाणी स्वातंत्र्य पूर्व काळात ज्या व्यक्तीनी कारावास भोगावा लागला, अशा ऐतिहासिक वास्तूचे आज शालेय विद्यार्थी आणि सामाजिक संस्था करिता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये उदघाटन करण्यात आले. मात्र मुख्यमंत्री आणि गृहमंत्री हे व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सहभागी झाले होते. त्या पार्श्वभूमीवर कार्यक्रमा दरम्यान येरवडा भागातील येरवडा गेनबा सोपनराव मोझे संस्थेतील 10 विद्यार्थ्यांना विशेष निमंत्रित केले होते.

या विद्यार्थ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबत सर्व वास्तूंची पाहणी केली. विद्यार्थिनींनी प्रत्येक गोष्टीची उपस्थित अधिकारी वर्गाकडून सखोल माहिती जाणून घेतली. तर अधिकारी सांगतील ते वहीमध्ये नोंद करून ठेवते होते. ऐतिहासिक वास्तु पाहून झाल्यावर, अजित पवार यांनी सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांकडे पाहत म्हणाले, फोटो काढूयात हे ऐकून सर्वांच्या चेहर्‍यावर एक वेगळच आनंद पाहण्यास मिळाला.

फोटो काढून झाल्यावर अजित पवार यांनी एका विद्यार्थिनीला विचारले. तुझं नाव काय, कितवीला आहेस, त्यावर त्या विद्यार्थिनीने माझं नाव आयुषा शिर्के असून मी इयत्ता दहावीमध्ये आहे. दादा, ते ऐकताच म्हणाले, दहावीचं वर्ष म्हटल्यावर महत्वाच वर्ष आहे. तू दररोज शाळेत जाते का? किती जण दररोज वर्गात असतात? सर्व सुरक्षितता आहे ना आणि सर्व नियम पाळून वर्ग घेतले जातात ना हे सर्व प्रश्न तिला विचारल्यावर, त्या विद्यार्थिनीने “हो दादा थोडे थोडे विद्यार्थी येत आहेत आणि सर्व नियम पाळूनच शिकवले जात आहे” असे सांगितले.

त्यावर अजित पवार यांनी चांगला अभ्यास करण्याचा सल्ला दिला. अजित पवार यांनी तिच्याशी संवाद साधल्यानंतर लोकसत्ता ऑनलाईनच्या प्रतिनिधीने आयुषा सोबत यावर प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता. आजवर अजित पवार यांना टीव्हीवर पाहिले. मात्र आज त्यांनी आपुलकीने विचारपूस केल्याने खूप आनंदी असल्याची भावना व्यक्त केली.