पिंपरी-चिंचवड शहरात करोना विषाणूने थैमान घातले असून शहरातील काही परिसर आज मध्यरात्रीपासून सील करण्यात येणार आहेत. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने याबाबत माहिती दिली आहे. शहरातील करोनाबाधितांची संख्या वाढू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला असून याची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पालिका प्रशासनाच्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड शहरातील चार भाग सील करण्यात येणार आहेत. यामध्ये १) घरकुल रेसीडेन्सी बिल्डींग क्र. ए १ ते २० चिखली, २) जामा मस्जिद, खराळवाडी, ३) कमलराज बालाजी रेसीडन्सी, रोडे हॉस्पीटल जवळ, दिघी, भोसरी, ४) शिवतीर्थ नगर, पडवळनगर थेरगाव. या भागांचा समावेश आहे.

सील करण्यात आलेला भाग

  1. घरकुल रेसीडेन्सी बिल्डींग क्र. ए १ ते २० चिखली. (पवार इंडीस्ट्रीयल परीसर नेवाळे वस्ती).
  2. जामा मस्जिद, खराळवाडी (गिरमे हॉस्पीटल, अग्रेसन लायब्ररी, क्रिश्ना ट्रेडर्स, चैताली पार्क हौसिंग सोसायटी गार्डन, ओम हॉस्पीटल, ओरीयंटल बँक, सीटी प्राईड हॉटेल, क्रिस्टल कोर्ट हॉटेल, गिरमे हॉस्पिटल).
  3. कमलराज बालाजी रेसीडन्सी, रोडे हॉस्पीटल जवळ, दिघी, भोसरी (रोडे हॉस्पीटल, एसव्हीएस कॉम्प्युटर, स्वरा गिप्ट शॉपी, साई मंदीर रोड अनुष्का ऑप्टीकल शॉप, रोडे हॉस्पीटल).
  4. शिवतीर्थ नगर, पडवळनगर थेरगाव (शिरोळे क्लिनिक, गणेश मंदीर, निदान क्लिनिक, किर्ती मेडीकल, रेहमानिया मस्जिद, ऑर्कीड हॉस्पिटल, अशोका सोसायटी रोडवरील गणपती मंदीर ते शिरोळे क्लिनिक).

या परिसरामध्ये पोलीस प्रशासनाकडून पुढील आदेशापर्यंत पूर्णपणे संचारबंदी लागू असणार आहे. त्याचबरोबर सील केलेल्या परिसरातील प्रत्येक नागरिकाने तोंडाला मास्क अथवा घरगुती स्वच्छ धुतलेला कापडी रुमाल लावणे बंधनकारक करण्यात आले आहे.

 जीवनावश्यक वस्तू आणि सेवांचा पुरवठा करणाऱ्यांना सूट

दरम्यान, या आदेशातून जीवनाश्यक वस्तू आणि सेवांचा पुरवठा करण्याऱ्या व्यक्तींना वगळण्यात आले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Four divisions in pimpri chinchwad will be sealed from midnight today backdrop of corona virus aau 85 kjp
First published on: 08-04-2020 at 14:33 IST