‘पीएमआरडीए’च्या मेट्रो स्थानकांभोवती चार एफएसआय

पुणे :  पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पुणे मेट्रोपॉलिटन रिजनल डेव्हलपमेंट अ‍ॅथॉरिटी – पीएमआरडीए) प्रस्तावित हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्गिके साठीचे प्रभाव क्षेत्र (ट्रान्झिट ओरिएंटल डेव्हलपमेंट – टीओडी) राज्य शासनाकडून निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार मेट्रो स्थानकाच्या ५०० मीटर अंतरामध्ये चार चटई क्षेत्र निर्देशांक (फ्लोअर स्पेस इंडेक्स – एफएसआय) दिला जाणार आहे. चार एफएसआय वापरून बांधकामे करण्यात येणार असल्यामुळे पायाभूत सुविधांवरील ताणही वाढणार आहे.

दरम्यान, पुण्यातील वनाज ते रामवाडी या मार्गिके तील स्थानकांसाठी दोन्ही बाजूला ५०० मीटर अंतरावर चार एफएसआय देण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे. त्याच धर्तीवर पीएमआरडीएच्या मार्गिके चे टीओडी क्षेत्र निश्चित करण्यात आले आहे.

पीएमआरडीए कडून हिंजवडी-शिवाजीनगर हा मेट्रो मार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे. हा मार्ग २३ किलोमीटर लांबीचा आहे. यामध्ये २३ स्थानके  प्रस्तावित आहेत. मेट्रो मार्ग हा बांधा-वापरा-हस्तांतरित (बीओटी) तत्त्वावर हा प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी मेट्रो स्थानकालगतच्या दोन्ही बाजूला ५०० मीटर अंतराच्या परिसरात चार एफएसआय द्यावा, असा प्रस्ताव पीएमआरडीएकडून राज्य शासनाला पाठविण्यात आला होता. मात्र गेल्या कित्येक दिवसांपासून हा प्रस्ताव प्रलंबित होता. मात्र राज्याच्या नगरविकास खात्याने प्रस्तावित मेट्रो मार्गिके चे प्रभाव क्षेत्र निश्चित के ले आहेत. प्रभाव क्षेत्र निश्चित झाल्यामुळे स्थानकाच्या परिसरात चार एफएसआयचा वापर करून बांधकामांना परवानी दिली जाणार आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातून ही मेट्रो मार्गिका जाणार आहे. स्थानकाच्या परिसरात टीओडी क्षेत्र निश्चित के ल्यामुळे हिंजवडी, बाणेर, बालेवाडी, वाकड, माण आणि शिवाजीनगर या भागात मोठी बांधकामे होणार आहेत. त्याचा पायाभूत सुविधांवरही ताण येण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनकडून पुण्यात दोन मेट्रो मार्गिकांची कामे हाती घेण्यात आली आहेत. यातील एक मार्ग स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड असा असून दुसरा मार्ग वनाज ते रामवाडी असा आहे. या दोन्ही मार्गिकांची मिळून एकू ण लांबी ३२ किलोमीटर एवढी आहे. पुण्यातही स्थानकालगतचे क्षेत्र टीओडी म्हणून जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे स्थानकाभोवतीच्या दोन्ही बाजूला पाचशे मीटर अंतरावर चार एफएसआय मिळणार आहे. एफएसआयच्या माध्यमातून मिळणारे निम्मे उत्पन्न महापालिका आणि महामेट्रोला मिळणार आहे.

केंद्र, राज्य सरकारकडून ३ हजार कोटी

हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्गिके ची निविदा प्रक्रिया २०१७ मध्ये सुरू करण्यात आली. हा प्रकल्प ८ हजार कोटींचा आहे. निविदांचे टप्पे पूर्ण करणे, राज्याची आणि के ंद्राची मंजुरी मिळविणे, शासकीय आणि खासगी जागा संपादित करणे, वित्तीय व्यवस्था अशी कामे पीएमआरडीएकडून १४ महिन्यांत पूर्ण झाली आहेत. टाटा सिमेन्स कं पनीला हे काम देण्यात आले आहे. के ंद्र सरकार, राज्य सरकारकडून वित्तीय तूट, जमिनीच्या स्वरूपात भूसंपादन आणि पुनर्वसनाच्या कामासाठी ३ हजार कोटी रुपये देण्यात येणार आहेत.