पुण्यातील हडपसर भागात दुचाकीला कट का मारला? याचा जाब विचारल्याने चौघांनी बेदम मारहाण करून एका तरुणाचा डोळा फोडल्याची घटना घडली. या प्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर एकजण फरार झाला आहे. योगेश हनमने, रितेश जाधव आणि अविनाश गायकवाड अशी ताब्यात घेण्यात आलेल्या तिघांची नावं आहे.
पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटेच्या सुमारास मुंढवा चौकातून योगेश हनमने, रितेश जाधव आणि अविनाश गायकवाड हे तिघे त्यांच्या चारचाकी वाहनातून जात होते. तर, अक्षय जाधव आणि सतीश वानखेडे हे देखील दुचाकीवरून जात होते. दरम्यान सतीश वानखेडेच्या दुचाकीला चारचाकीने कट मारला. म्हणून अक्षय जाधव आणि सतीश वानखेडे यांनी त्या चारचाकी गाडीचा पाठलाग केला व कट मारल्याबद्दल जाब विचारला. त्यावर चारचाकी गाडीतील तिघांनी अक्षय जाधव आणि सतीश वानखेडे यांना बेदम मारहाण केली.
या मारहाणीत सतीश वानखेडेला गंभीर दुखापत झाली शिवाय त्याचा डोळा फुटला असल्याची माहिती मिळाली आहे. या मारहाणीत जखमी झालेल्या दोघांनाही रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच मारहाण करणार्या तिघांना ताब्यात घेण्यात आल्याचे हडपसर पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 5, 2020 8:20 pm