News Flash

पुण्यात आयटी पार्कमध्ये तरूणीवर सामूहिक बलात्कार; आठवड्याभरातील दुसरी घटना

पुण्यात एकच खळबळ उडली असून, नोकरदार महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

प्रातिनिधिक छायाचित्र

पुण्यातील हनुमान टेकडीवर विद्यार्थीनीवरील बलात्काराची घटना ताजी असताना आता आयटी पार्कमधील तरुणीवर सामूहिक बलात्काराची घटना समोर आली आहे. २४ वर्षीय तरूणीवर तिच्याच मित्रांनी शितपेयातून गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली.  धानोरी परिसरात शनिवारी ही घटना घडली. या प्रकरणी पाच तरूणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेने पुण्यात एकच खळबळ उडली असून, नोकरदार महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सदर पिडीत मुलगी कार्यालयातील सहकारी मित्रांसह एका पार्टीसाठी गेली होती. त्यावेळी मद्यप्राशन केलेल्या तिच्या सहका-यांनी तिला जबरदस्तीने एका अपार्टमेन्टमध्ये नेले आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. पिडीत मुलगी मुंढवा येथे राहणारी असून तिच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 28, 2016 2:16 pm

Web Title: gang rape on girl in punes it park
Next Stories
1 नाव, गणवेश बदलून हमालांच्या परिस्थितीत फरक पडणार का?- डॉ. बाबा आढाव
2 कंत्राटी कामगारांचे किमान वेतन पंचवीस हजार करा
3 पावणेतीन लाख प्रतिशब्द संकेतस्थळावर उपलब्ध
Just Now!
X