News Flash

भोसरीत तरूणावर गोळीबार; शहरात २४ तासातील दुसरी घटना

पिंपरी-चिंचवडमध्ये गुन्हेगारी फोफावली

पिंपरी-चिंचवड : गोळीबार झालेले ठिकाण.

भोसरीच्या गवळीमाथा परिसरात शनिवारी एका तरुणावर गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली. यामध्ये हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये सध्या गुन्हेगारी फोफावली असून गेल्या २४ तासांत याठिकाणी गोळीबाराची ही दुसरी घटना घडल्याचे शिक्कामोर्तब झाले आहे. यामुळे पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय घोलप असे गोळीबारात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. घोलप याचे ‘जय महाराष्ट्र स्नॅक्स सेंटर’ नावाचे हॉटेल आहे. ते आज सकाळी नेहमीप्रमाणे हॉटेल उघडण्यासाठी आले होते. हॉटेल उघडल्यानंतर त्यांचे दैनंदिन काम सुरु असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी एकाने बंदुकीतून विजय यांच्यावर पाच गोळ्या झाडल्या. यामध्ये विजय गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्या उजव्या हातातून एक गोळी आरपार गेली तर डाव्या हाताला दोन गोळ्या चाटून गेल्या आहेत. हा गोळीबार पूर्ववैनस्यातून झाला असल्याचा संशय एमआयडीसी पोलीसांनी व्यक्त केला आहे. सध्या पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.

तत्पूर्वी काल दुपारी साडेतीन वाजता अज्ञात व्यक्तींनी पिंपरीच्या साधू वासवाणी चौकात हॉटेलमध्ये बसलेल्या संतोष कुरावत यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. या घटनेला २४ तास उलटून गेल्यानंतरही आरोपींना गजाआड करण्यास पिंपरी पोलिसांना यश आलेले नाही. ही घटना ताजी असताना भोसरी येथील गवळीमाथा येथे घोलप यांच्यावर गोळीबार झाल्यामुळे पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक राहिलेला नाही, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2017 12:16 pm

Web Title: gun firing second incident in 24 hours in the bhosari city
Next Stories
1 खासदार काकडे यांच्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश
2 बंद सहकारी साखर कारखाने शासन घेणार
3 हिंजवडीला जोडणाऱ्या रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करा
Just Now!
X