-कृष्णा पांचाळ

एकटी-एकटी घाबरलीस ना.. वाटलंच होत आई…. ‘आई’ या शब्दांमध्ये खूप काही दडलेलं आहे. खर तर गेल्या दीड महिन्यापासून पोलीस दलात कर्तव्य पार पाडत असलेल्या मनिषा हाबळे यांची देखील अशीच काहीशी अवस्था आहे. काही दिवसांपासून त्या आपल्या दोन्ही मुलींना भेटू शकत नाहीत. करोना विषाणू प्रादुर्भावाची भीती असल्याने दोन्ही मुलींना त्या पिंपरी-चिंचवड शहरात आणण्याचा विचारही करू शकत नाहीत. त्यामुळेच त्या व्हिडिओ कॉलद्वारे आपल्या दोन्ही मुलींना मिळेल त्या वेळेत बोलत असतात.

Kangana Ranaut Vikramaditya Singh Himachal Pradesh Mandi Loksabha Election 2024
Celebrity Fight: कंगनासमोर राजघराण्यातील वंशजाचे आव्हान; सोनिया गांधींनी केली वाट बिकट
Police dressed as priests in Uttar Pradesh
अन्वयार्थ : पोलीस पुजारी.. की पुजारी पोलीस!
MNS-BJP Alliance
मनसे महायुतीत येणार का? पाडवा मेळाव्याआधी देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान; म्हणाले, “राज ठाकरे हे पहिले व्यक्ती…”
loksatta editorial on reserve bank of india 90th anniversary ceremony
अग्रलेख: टाकसाळ आणि टिनपाट

आज  ‘मदर्स डे’ निमित्त त्या मुलींना सांगतात की, मुलींनो मी आणि तुमचे बाबा आम्ही दोघे ही तुमच्यावर खूप प्रेम करतो. परंतु, आमचं कर्तव्यंही महत्वाचं आहे. मनिषा शिवाजी हाबळे या पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक विभागात कार्यरत असून शिवाजी हाबळे हे पुण्यातील बॉम्ब शोध आणि नाशक पथकात कार्यरत आहेत. या दाम्पत्याला दोन मुली असून १२ वर्षीय श्री आणि ३ वर्षीय मुलीचं नाव पृथ्वी आहे.

मनिषा हाबळे म्हणतात, या दोन्ही दोघी घरात असल्या की, घर अगदी फुलून जायचं. परंतु, गेल्या दोन महिन्यापासून घर सुन्न पडलं आहे. सध्या त्यांच्या आठवणीने आई मनिषा व्याकुळ झाल्या आहेत. दोन महिन्यांपूर्वी दोघी बहिणींना आजोळी म्हणजे सांगली जिल्ह्यातील अष्टा येथे सोडण्यात आले आहे. लॉकडाउनमुळे त्या तिथेच अडकल्या आहेत. तर इकडे हाबळे दाम्पत्य आपले कर्तव्य बजावत असून नागरिकांनी आपल्या कुटुंबासोबत सुरक्षित राहावं अस आवाहन करत आहेत. हे दोघेही रात्री कामावरून घरी परतल्यावर पृथ्वी आणि श्री या आपल्या मुलींना व्हिडिओ कॉलद्वारे बोलतात. बोलणं झाल्यानंतर त्यांचा थकवा नाहीसा होतो, असं ते आवर्जून सांगतात. लहान असलेल्या पृथ्वीने तर आई-बाबा घ्यायला येत नाहीत म्हणून फोनवर बोलणंच सोडून दिलं होतं. तिच्या भाषेत म्हणायचं झालं तर तिने आई-बाबांशी कट्टी केली होती.

यामुळे मनिषा हाबळे काहीशा चिंताग्रस्त झाल्या होत्या. मात्र, पृथ्वी पुन्हा छान बोलायला लागल्याने त्यांच्यात नवचैतन्य आलं. मायची कळ आणि उन्हाची झळ सध्या मनीषा हाबळे सहन करत आहेत. मदर्स डे निमित्त मुलींसाठी त्यांनी एक संदेश दिला आहे. त्या म्हणतात की, माझं मुलींवर खूप प्रेम आहे. तुमच्यासाठीच आम्ही जीवन जगत आहोत. जशी तुम्ही माझी मुले आहात. त्याचप्रमाणे इतरांची मुले आहेत त्यांची काळजी घेणं संरक्षण देणं गरजेचं आहे. करोनाचं संकट जगभरात सुरू आहे. त्यामधून प्रत्येक कुटुंब हे सुरक्षित राहावं. म्हणून आम्ही आमच्या कुटुंबाला प्रथम प्राधान्य न देता देशातील कुटुंबाला प्राधान्य देऊन कर्तव्य पार पाडत आहोत.