27 September 2020

News Flash

पुणे शहरात पावसाची दमदार हजेरी

संध्याकाळी ४ वाजल्यापासून पावसाला सुरुवात झाली.

पुणे : शहरात पहिल्यांदाच यंदाच्या मोसमातील मान्सूनच्या पावसाने बुधवारी जोरदार हजेरी लावली.

यंदाच्या मोसमात राज्यभरात मान्सून व्यापल्यानंतर पुणे शहर आणि जिल्ह्यामध्ये पावसाने बुधवारी दमदार हजेरी लावली. शहरातील जवळपास सर्वच भागांना पावसाने चांगलेच झोडपून काढले. संध्याकाळी ४ वाजल्यापासून पावसाला सुरुवात झाली, अद्यापही पावसाचा जोर कायम आहे.

सकाळपासूनच शहरात मोठ्या प्रमाणावर उकाडा जाणवत होता. त्याचबरोबर आकाशात ढगही दाटून आले होते. दुपारच्या सुमारास अधूनमधून पावसाचे थेंब प़डत होते. मात्र, त्यानंतर संध्याकाळी चार वाजण्याच्या सुमारास शहरातील अनेक भागांमध्ये अचानक अंधारुन येऊन जोरदार पावसाला सुरुवात झाली. यावेळी कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या लोकांची चांगलीच तारांबळ उडाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 17, 2020 4:16 pm

Web Title: heavy rains begin in pune city aau 85 svk 88
Next Stories
1 पुणे : सोशल डिस्टंसिंगचे पालन करत पार पडली मनपाची सर्वसाधारण सभा
2 ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ अंतर्गत पुण्यात सात हजार कोटींची गुंतवणूक
3 प्रतिबंधित क्षेत्रात आजपासून मुभा
Just Now!
X