27 September 2020

News Flash

भादंवि, फौजदारी दंडसंहितेत बदलाचे गृहमंत्र्यांचे संकेत

केंद्रीय गृहमंत्रालयाने अलीकडेच सर्व राज्य सरकारांकडून भादंवि तसेच गुन्हेगारी दंडसंहितेत करावयाच्या बदलांबाबत शिफारशी मागवल्या होत्या

(संग्रहित छायाचित्र)

 

देशात बलात्कारासारखे गंभीर गुन्हे घडत असून अशा प्रकरणात फौजदारी न्यायव्यवस्थेतून न्याय मिळण्यास विलंब होत असल्याच्या पाश्र्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भादंवि आणि गुन्हेगारी दंडसंहितेत बदल करण्याचा राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारचा इरादा असल्याचे स्पष्ट केले.

केंद्रीय गृहमंत्रालयाने अलीकडेच सर्व राज्य सरकारांकडून भादंवि तसेच गुन्हेगारी दंडसंहितेत करावयाच्या बदलांबाबत शिफारशी मागवल्या होत्या. आधुनिक लोकशाहीचे प्रतिबिंब व जलद न्याय या दोन्ही गोष्टींची अपेक्षा या सुधारणांमधून आहे. पोलीस महासंचालक व पोलीस महानिरीक्षकांची ५४ वी परिषद नुकतीच पुण्यात घेण्यात आली, त्या वेळी अमित शहा यांनी भादंवि व गुन्हेगारी दंडसंहितेत बदलाचे सूतोवाच केले.

२०१२ मधील निर्भया सामूहिक बलात्कार व खून प्रकरणानंतर विविध मंचांवरून महिला अत्याचारांच्या गुन्ह्य़ात न्याय मिळण्यास विलंब होत असल्याची तक्रारी करण्यात आल्या होत्या. शहा यांनी पुण्यातील परिषदेत अखिल भारतीय पोलीस विद्यापीठ व अखिल भारतीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठ स्थापन करण्याचीही घोषणा केली होती. या परिषदेवेळी देशातील वरिष्ठ पोलीस अधिकारी धोरणात्मक निर्णयांसाठी एकत्र जमले होते. पंतप्रधान मोदी, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, केंद्रीय गृह सचिव अजय कुमार भल्ला या वेळी उपस्थित होते.

या वेळी अंदमान निकोबार बेटांवरील अबेरदीन, गुजरातमधील बालसिनोरे, मध्य प्रदेशातील बुऱ्हाणपूर येथील पोलीस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांना उत्कृष्ट पोलीस ठाण्याचे चषक प्रदान करण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 9, 2019 12:41 am

Web Title: home minister signs the change in the criminal penal code abn 97
Next Stories
1 उन्नावमधील तरुणीच्या पार्थिवावर बंदोबस्तात अंत्यसंस्कार
2 हैदराबाद ‘चकमकी’च्या चौकशीसाठी समितीची घटनास्थळी, शवागराला भेट
3 काश्मीरमधील निर्बंध मागे घेण्याची अमेरिकी प्रतिनिधिगृहात मागणी
Just Now!
X