News Flash

दोन गटांच्या वादातून पिंपरीत १५ वाहनं फोडली, संशयित आरोपी ताब्यात

तोडफोडीच्या घटनेने पिंपरीत तणावाचं वातावरण

तोडफोडीत गाड्यांची झालेली अवस्था

पिंपरी-चिंचवड परिसरात वाहनांच्या तोडफोडीचं सत्र काही केल्या थांबण्याचं नाव घेताना दिसत नाहीये. पिंपरीमध्ये दोन गटांमधील जुन्या वादातून १५ वाहनांची तोडफोड करण्यात आलेली आहे. या प्रकरणी पिंपरी पोलिसांनी एका संशयीत आरोपीला ताब्यात घेतलं आहे. दिनेश गायकवाड असं आरोपीचं नाव असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,भोसरी मधील बालाजी नगर आणि पिंपरीतील विठ्ठल नगर येथील दोन गटात दीड महिन्यापूर्वी वाद झाला होता. त्यावेळी विठ्ठल नगर येथील काही तरुणांनी बालाजी नगर येथे जाऊन तेथील तरुणांना बेदम मारहाण केली होती. याचा बदला घेण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून बालाजी नगर येथील तरुण विठ्ठल नगर परिसरात दुचाकीवर फिरत होते, मात्र संबंधित व्यक्ती मिळत नसल्याने रात्री दहाच्या सुमारास १० जणांच्या टोळक्याने १५ वाहनांची तोडफोड करत दिसेल त्याला मारहाण केली आहे.

या टोळक्याच्या मारहाणीत गणेश नेहरकर आणि संभाजी म्हस्के या दोन व्यक्ती जखमी झाल्या असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेदरम्यान टोळक्यातील तरुणांच्या हातात तलवार, कोयते असल्यामुळे रात्री या परिसरात भीतीचं वातावरण पसरलं होतं. सध्या पोलिसांनी एका संशयीताला ताब्यात घेतलं असून, परिस्थीती नियंत्रणात असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 16, 2018 3:41 pm

Web Title: in fight between two groups 15 vehicles vandalize in pimpri chinchwad area police detain one person
Next Stories
1 पुण्यातील भाजपा नगरसेविकेच्या घरी चोरी, नऊ तोळे सोनं लांबवलं
2 पाण्याच्या लेखापरीक्षणाचे पालिकेला वावडे
3 अवैध बांधकामांची समस्या कायम
Just Now!
X