पिंपरी-चिंचवड शहरात करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दहा दिवसांचे कडक लॉकडाउन लागू करण्यात आले असून यापैकी, आठ दिवस होऊन गेले आहेत. परंतु, आज नवव्या दिवशी शहरातील बाधित रुग्णांनी ‘उच्चांकी’ आकडा पार केला आहे. शहरात आज  दिवसभरात एकूण 927 करोनाबाधित आढळले असून 15 जणांचा मृत्यू झाला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण बाधित रुग्णांची संख्या 13 हजार 107 वर पोहचली असून आत्तापर्यंतची सर्वाधिक उच्चांकी संख्या आज करोनाबाधित रुग्णांनी गाठली आहे. यापैकी, आत्तापर्यंत 8 हजार 40 रुग्ण करोनामुक्त झाले असून आज 203 जणांनी करोनावर मात केली आहे. दरम्यान, शहरातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 3 हजार 379 झाली आहे.

एकीकडे  करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउन लागू केला असल्याच बोललं जात आहे. प्रत्यक्षात मात्र, करोनाबाधितांचा आकडा वाढत असल्याचे चित्र पिंपरी-चिंचवड शहरात दिसत आहे. अशाच प्रकारे करोनाबाधितांचा आकडा वाढत राहिल्यास शहरातील नागरिकांची चिंता नक्की वाढेल, यात काही शंका नाही. नागरिकांनी देखील राज्य शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.