पुणे शहरात दिवसभरात १ हजार ९२५ करोनाबाधित वाढले असून, सात रूग्णांचा मृत्यू झाला आहे. शहरातील एकूण बाधितांची संख्या आता २ लाख २१ हजार २२० वर पोहचली आहे. आजपर्यंत शहरात ४ हजार ९६९ रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. दरम्यान आज ६७७ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. तर आजअखेर २ लाख ३ हजार १६ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात ८९४ तर महानगर पालिकेच्या हद्दीबाहेरील ६ जण करोनाबाधित आढळले असून, ५५२ जण करोनामुक्त झाले आहेत. तर पाच रूग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण बाधितांची संख्या १ लाख १५ हजार ६४८ वर पोहचली आहे. यापैकी, १ लाख ६ हजार ४८१ जण करोनातून बरे झाले आहेत. पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १ हजार ६३३ असल्याची माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

Coronavirus – “…तर पुणे शहराचे लसीकरण दोन महिन्यात पूर्ण होईल”

केंद्र सरकारच्या आदेशानुसार देशभरात लसीकरणला सुरुवात झाली असून, पुण्यात आजअखेर १ लाख ७५ नागरिकांना लस देण्यात आलेली आहे. शहराची लोकसंख्या लक्षात घेता, दररोज ३० ते ४० हजार नागरिकांना लसीकरण करण्याची गरज आहे. मात्र सध्या १३ ते १४ हजार नागरिकांना लसीकरण केले जात आहे. लसीकरण वाढविल्यास पुणे शहरातील सर्व नागरिकांचे लसीकरण दोन महिन्यात पूर्ण होईल, असा विश्वास महापौर मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला. मात्र यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने योग्य समन्वय साधून लसीकरण वाढवावे, अशी मागणी देखील त्यांनी केली. तर यामुळे शहरातील करोना संसर्ग नियंत्रणात येण्यास अधिक मदत होईल, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

Coronavirus – चिंताजनक : राज्यात दिवसभरात ८७ रूग्णांचा मृत्यू, १७ हजार ८६४ करोनाबाधित वाढले

राज्यात करोना संसर्गाचा वेग आता अधिकच झपाट्याने वाढल्याचे दिसत आहे. दररोज आढळणाऱ्या करोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत असून, मृत्यूंची संख्या देखील वाढत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारकडून निर्बंध अधिक कडक केले जात आहे. अनेक शहरांमध्ये लॉकडाउन देखील सुरू करण्यात आला आहे. आज दिवसभरात राज्यात ८७ रूग्णांचा मृत्यू झाला असून, १७ हजार ८६४ करोनाबाधित वाढले आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर २.२६ टक्के एवढा झाला आहे. तर, राज्यात आज रोजी एकूण १,३८,८१३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.