पुणे शहरात आज दिवसभरात नव्याने १,३०८ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या ५१ हजार ७३८ एवढी झाली आहे. तर दिवसभरात ३९ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे आज अखेर १ हजार २५४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. करोनावर उपचार घेणार्‍या २,५४३ रुग्णांची तब्येत ठणठणीत असल्याने, सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आज अखेर ३२ हजार ६२३ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत देण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात दिवसभरात १ हजार ७७ करोनाबाधित रुग्ण आढळले. तर दिवसभरात ११ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, ३१६ जणांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या १९ हजारांच्या पार गेली असून १९ हजार ४३१ वर पोहचली आहे. यांपैकी, १२ हजार २७८ जण करोनामुक्त झाले आहेत. महापालिकेच्या रुग्णालयात ३ हजार १४२ जण सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.