दिग्गज नेते विलास लांडे यांना पराभूत करून ‘भोसरी संस्थान’वर ताबा मिळवणारे अपक्ष आमदार महेश लांडगे भाजपच्या वाटेवर आहेत, अशी जोरदार चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या पुणे दौऱ्यानंतर त्या चर्चेत भर पडली असून पुण्यात होणाऱ्या भाजप कार्यकारिणीच्या बैठकीदरम्यान त्यांचा प्रवेश होणार असल्याचे बोलले जाऊ लागले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री गिरीश बापट यांना लांडगे भाजपमध्येच हवे आहेत. तर, भाजपच्या काही स्थानिक नेत्यांचा लांडगे यांच्या पक्षप्रवेशाला विरोध आहे. तूर्त, ‘तांत्रिक कारणास्तव’ लांडगेंचा पक्षप्रवेश लांबणीवर पडला असून ते ‘योग्य’ वेळेच्या प्रतीक्षेत असल्याचे सांगण्यात येते.
महेश लांडगे यांच्या भाजप प्रवेशाचा विषय थोडय़ा दिवसांच्या अंतराने पुन्हा-पुन्हा चर्चेला येतो. अमित शहा रविवारी पुण्यात येऊन गेले, त्याच दिवशी लांडगे यांचा प्रवेश होणार होता आणि ‘होता-होता’ तो राहिला, अशी चर्चा ताजी असतानाच पुण्यातील कार्यकारिणी बैठकीत त्यांचा प्रवेश होणार असल्याच्या चर्चेने उचल खाल्ली आहे. तथापि, लांडगे यांनी या चर्चेचे खंडन केले आहे. पक्षप्रवेशाच्या प्रश्नावर लांडगे यांनी वेळोवेळी साधलेले मौन, गूढ हालचाली आणि त्यांच्या निकटवर्तीय मंडळींकडून घालण्यात येणारे खतपाणी, यामुळेच अशा चर्चाना उत येतो, हे उघड गुपित आहे.
महेश लांडगे अपक्ष आमदार आहेत. मात्र, पिंपरी पालिकेतील राष्ट्रवादीच्या नगरसेवक पदाचा त्यांनी अद्याप राजीनामा दिलेला नाही. पक्षांतरबंदी कायद्याचा बडगा टाळण्यासाठी आणखी काही दिवस त्यांना दुसऱ्या पक्षात जाता येणार नाही. तीच स्थिती त्यांच्या समर्थक नगरसेवकांची आहे. ‘योग्य’ वेळ येईपर्यंत ही मंडळी, आहे तिथेच थांबणार असून त्यानंतर ते भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी अटकळ आहे. लांडगे यांना क्रीडा विषयाशी संबंधित लाल दिव्याचे पद हवे आहे. शिवाय, त्यांच्या मतदारसंघात भरीव विकासकामे आणि समर्थकांना पालिका निवडणुकीत भाजपची उमेदवारी मिळण्याची खात्री हवी आहे. पक्षप्रवेशाचा कार्यक्रम भोसरीच्या गावजत्रा मैदानात आणि अमित शहा व मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत घेण्याचा लांडगे यांचा आग्रह आहे. अशा गोष्टी भाजप वर्तुळातून सांगितल्या जातात. मात्र, लांडगे काही
भाष्य करत नाहीत. भाजपचा एक गट लांडगे यांच्या स्वागतासाठी उत्सुक असून दुसरा गट त्यांच्या पक्षप्रवेशाच्या विरोधात आहे. लांडगे पक्षात आल्यास भोसरी परिसरातील भाजपची ताकद वाढणार असून राजकीय गणिते पूर्णपणे बदलणार आहेत. मात्र, आतापर्यंत भाजपचा झेंडा फडकावणारे या भागातील नेते व त्यांच्या कार्यकर्त्यांचा अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होणार आहे. तूर्त लांडगे यांच्या प्रवेशाचा प्रश्न भाजपच्या वरिष्ठ पातळीवर चर्चेत आहे. राज्यात भाजप आमदारांचे अपुरे संख्याबळ आणि सत्तेत असूनही शिवसेनेचे ‘विरोधी धोरण’ पाहता ‘अपक्ष’ लांडगे यांची भाजपला गरज आहे व त्यासाठीच लांडगे यांना गोंजारण्याचे काम सध्या सुरू आहे.

भाजपमध्ये प्रवेश करण्याचा किंवा मंत्रिपद मिळण्याचा कोणताही विषय नाही. अजून कशात काही नाही. याबाबतची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सातत्याने होते आहे. व्हॉट्स अ‍ॅप आणि फेसबुकवरही त्यावर पोस्ट पडत असतात. मात्र, तूर्त तसे काहीही नाही.
– महेश लांडगे, अपक्ष आमदार, भोसरी

Nandurbar, Heena Gavit,
नंदुरबारमध्ये डॉ. हिना गावित यांच्यासमोर स्वपक्षीय, मित्रपक्षांच्या नाराजीचे आव्हान
vasai leopart marathi news, vasai fort leopard marathi news
वसई : बिबट्याच्या दहशतीचा परिणाम, रोरोच्या संध्याकाळच्या शेवटच्या दोन फेऱ्या रद्द
dombivali, 17 year old bangladeshi girl,
आईला वेश्याव्यवसायातून वाचवण्यासाठी मुलीनं केलं बाळाचं अपहरण..
hemant patil
भाजपहट्टापुढे शिंदेसेना हतबल; हिंगोली, यवतमाळचे उमेदवार बदलण्याची नामुष्की