निर्यातीमध्ये घट झाल्यामुळे यंदा दर २० टक्क्य़ांनी उतरले

राहुल खळदकर, लोकसत्ता

पुणे : खाद्यपदार्थ र्निजतुक करण्यासाठी जी कीटकनाशके वापरण्यात येतात, त्याबाबतच्या नियमावलीत युरोपमधील अन्नधान्य प्रशासनाने बदल केल्याचा परिणाम भारताकडून निर्यात होणाऱ्या तांदळावर झाला असून नव्या नियमावलीनुसार युरोपातील देशांनी भारतीय बासमती तांदळाची आयात नाकारली आहे. तांदूळ निर्यातीमध्ये घट झाल्यामुळे यंदा बासमतीचे दर २० टक्क्य़ांनी उतरले आहेत.

एप्रिल ते सप्टेंबर २०१९ मध्ये बासमतीची निर्यात २१ कोटी ३४ लाख टन झाली होती. हे निर्यातमूल्य १५ हजार ३३१ कोटी एवढे होते. त्यानंतर पुढील दोन महिन्यात निर्यात घटून ती २० कोटी ८२ लाख टनांवर आली. त्याचे निर्यातमूल्य १३ हजार ७०० कोटी एवढे आहे. गेल्या आर्थिक वर्षांत बासमती तांदळाची निर्यात ४० लाख टन झाली होती. गेल्या आर्थिक वर्षांत निर्यातीतून ३२ हजार ८०० कोटी रुपये उत्पन्न मिळाले होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत  यंदा बासमती निर्यातीतून मिळणारे उत्पन्न घटेल, असा अंदाज असल्याचे शहा यांनी नमूद केले.

देशातील काही भागांमध्ये अवेळी झालेला पाऊस तसेच काही ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात आहे. त्याचा उत्पादनावर परिणाम झाला आहे. भाताची पेरणी जून, जुलैच्या दरम्यान केली जाते. यंदा लावणी लांबल्यामुळे नवीन तांदळाची आवक सुरू होण्यास उशीर झाला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत बासमती भाताचे उत्पादन प्रतिएकरी ३५ क्विंटलवरून २८ क्विंटल एवढे कमी झाले आहे. पारंपरिक बासमतीचे दर गेल्या वर्षी साडेनऊ हजार ते दहा हजार रुपये क्विंटल असे होते. यंदा हे दर कमी झाले असून ते साठेआठ हजार रुपये प्रतिक्विंटल झाले आहेत. ११२१ जातीच्या बासमतीचे दरही घटले आहेत. ते यंदा प्रतिक्िंवटल सात ते साडेसात हजार रुपये आहेत, अशीही माहिती शहा यांनी दिली.

तांदळाची बाजारपेठ..

जागतिक बाजारपेठेमध्ये भारतीय तांदळाला थायलंड, पाकिस्तान, मलेशिया आणि व्हिएतनामच्या तांदळाशी स्पर्धा करावी लागते. युरोपीय देश, आखाती राष्ट्रे आणि अमेरिकेत फळे आणि भाज्या आयात करताना त्यावरील किटकनाशकांचा वापर किती आणि कसा होतो, याबाबत कठोर नियम लावले जातात. गेल्या वर्षी आखाती राष्ट्रांनी कोकणातील हापूस आंबा याच कारणासाठी नाकारला होता. यंदा युरोपीय देशांनी बासमती नाकारल्याने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये भारतीय तांदळाची पत कमी होण्याची भीती आहे.

इराणकडूनही आयातबंदी..

इराणबरोबरचा निर्यात करार साधारणपणे दरवर्षी सप्टेंबर आणि ऑक्टोबर दरम्यान होतो. भारताने इराणकडून खनिज तेलाची आयात तसेच खरेदीवर निर्बंध आणल्याने इराणने भारतीय बासमती तांदळाच्या आयातीवर बंदी आणली आहे.

झाले काय?

यंदा बासमतीसह अन्य तांदळाच्या नवीन हंगामाला नैसर्गिक कारणांमुळे दीड ते दोन महिने उशीर झाला. एप्रिल ते सप्टेंबर २०१९ या कालावधीत बासमती तांदळाची निर्यात अडीच टक्क्य़ांनी कमी झाली. युरोपमधील देशांनी किटकनाशकांचे कारण दाखवत बासमतीच्या आयातीवर बंधने आणली आहेत. युरोपमधील आयात धोरणातील बदलांमुळे बासमती तांदळाचे दर सुमारे १५ ते २० टक्क्यांनी कमी झाले, अशी  माहिती फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे (फॅम) वरिष्ठ उपाध्यक्ष आणि जयराज आणि कंपनीचे संचालक राजेश शहा यांनी दिली.

बिगर बासमतीच्या निर्यातीतही घट

बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीतही एप्रिल ते सप्टेंबर २०१९ मध्ये घट झालेली आहे. गेल्या वर्षी या कालावधीत बिगर बासमतीची ४२ कोटी ८६ लाख टन एवढी निर्यात झाली होती. त्याचे मूल्य ११ हजार कोटी २३६ लाख रुपये होते. यंदा या कालावधीत ३७ कोटी २३ लाख टन एवढी निर्यात झाली. त्याचे मूल्य १० हजार कोटी ४२६ लाख रुपये आहे. २०१८-२०१९ या आर्थिक वर्षांत बिगर बासमती तांदळाचे उत्पादन ८६ कोटी ३५ लाख टन झाले. त्याचे मूल्य २२ हजार कोटी ९३० लाख रुपये होते. यंदा हे उत्पादन घटून ८० लाख टन एवढे झाले आहे. त्याचे मूल्य २१ हजार कोटी रुपये होईल, असा अंदाज असल्याचे राजेश शहा यांनी सांगितले.

इराणकडूनही नकार..

इराणबरोबरचा निर्यात करार साधारणपणे दरवर्षी सप्टेंबर आणि ऑक्टोबर दरम्यान होतो. भारताने इराणकडून खनिज तेलाची आयात तसेच खरेदीवर निर्बंध आणल्याने इराणने भारतीय बासमती तांदळाच्या आयातीवर बंदी आणली आहे.

झाले काय?

यंदा बासमतीसह अन्य तांदळाच्या नवीन हंगामाला नैसर्गिक कारणांमुळे दीड ते दोन महिने उशीर झाला. एप्रिल ते सप्टेंबर २०१९ या कालावधीत बासमती तांदळाची निर्यात अडीच टक्क्य़ांनी कमी झाली. युरोपमधील देशांनी कीटकनाशकांचे कारण दाखवत बासमतीच्या आयातीवर बंधने आणली आहेत. युरोपमधील आयात धोरणातील बदलांमुळे बासमती तांदळाचे दर सुमारे १५ ते २० टक्क्यांनी कमी झाले, अशी  माहिती फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे (फॅम) वरिष्ठ उपाध्यक्ष आणि जयराज आणि कंपनीचे संचालक राजेश शहा यांनी दिली.