रोज दोन हजार पेटया विक्रीसाठी दाखल

लालचुटूक, चवीला गोड आणि रसाळ असलेल्या हिमाचल प्रदेशातील किन्नूर सफरचंदांचा हंगाम सुरू झाला आहे. परदेशी सफरचंदाप्रमाणे चकचकीत असलेली किन्नूर सफरचंदे ग्राहकांच्या पसंतीस उतरली आहेत. भारत-चीन सीमेलगतच्या गावांतून किन्नूर सफरचंदांची आवक सध्या मार्केट यार्डातील  फळबाजारात सुरू झाली आहे.

किन्नूर सफरचंदे परदेशी सफरचंदाप्रमाणेच चकचकीत आहेत. परदेशी सफरचंदांपेक्षा किन्नूर चवीला गोड आणि रसाळ आहेत. मार्केट यार्डातील फळबाजारात दररोज दोन हजार किन्नूर सफरचंदांच्या पेटया विक्रीसाठी दाखल होत आहेत. घाऊक बाजारात प्रतवारीनुसार दहा किलो किन्नूर सफरचंदांना एक हजार ते चौदाशे रुपये दर मिळत असल्याची माहिती किन्नूर सफरचंदांचे फळबाजारातील विक्रेते अरविंद मोरे यांनी दिली.

हिमाचल प्रदेशातील ताबो, चांगो या गावात किन्नूर सफरचंदांची लागवड मोठय़ा प्रमाणावर केली जाते. तेथून ट्रकद्वारे माल पुण्यातील बाजारात विक्रीसाठी पाठविण्यात येतो. साधारणपणे किन्नूरचा हंगाम महिनाभर सुरू राहतो. यंदाच्या वर्षी हिमाचल प्रदेशात पोषक हवामानामुळे उत्पादन चांगले झाले आहे. फळांची गोडी आणि दर्जा चांगला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आवक चांगली होत आहे. कश्मिरी सफरचंदांच्या तुलनेत किन्नूर सफरचंदांचे दर थोडेसे जास्त आहेत. शहरातील विविध मॉल तसेच उपनगरातील फळ विक्रेत्यांकडून किन्नूर सफरचंदांना चांगली मागणी आहे, असे मोरे यांनी सांगितले.