फोनवर कुणासोबत बोलतेस असे विचारणाऱ्या पतीवर पत्नीने चाकूने वार केल्याची घटना पुण्यातील सिंहगड रोडवरील धायरी येथील रायकर मळा परिसरात घडली असून या घटनेच्या संदर्भात पत्नीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धायरी येथील रायकर मळा परिसरात पती, पत्नी आणि दोन मुले असे कुटुंब आहे. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास पती घरी आल्यावर त्याची पत्नी फोनवर बोलत होती. हे पाहून पती म्हणाला की, फोनवर कोणासोबत बोलतेस तुझा फोन मला बघू दे असे म्हटल्यावर ती महिला रागाच्या भरात किचनमध्ये जाऊन आतमध्ये असलेल्या चाकूने पतीच्या गळ्यावर आणि मानेवर वार केले. त्यानंतर जखमी झालेल्या व्यक्तीला जवळील रूग्णालयात दाखल करण्यात आले. तर या घटने बाबत तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून संबधित व्यक्तीच्या पत्नीला अटक करण्यात आली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 12th Apr 2019 रोजी प्रकाशित
फोनवर कुणाशी बोलतेस विचारणाऱ्या पतीवर चाकूने वार ; पत्नीला अटक
पत्नीला अटक करण्यात आली आहे.
Written by लोकसत्ता ऑनलाइन

First published on: 12-04-2019 at 23:01 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Knife wise on husband in pune