पुणे जिल्ह्यातील कुरकुंभ एमआयडीसी मधील अल्कली अमाईन्स केमिकल या कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. त्यामुळे केमिकल कंपनीच्या १० किलोमीटरचा परीसर रिकामा करण्यास सुरुवात केली.

अग्नीशमन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुणे सोलापूर रोडवरील कुरकुंभ एमआयडीसीमधील अल्कली अमाईनस केमिकल कंपनीमध्ये रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास स्फोट झाल्याची घटना घडली. या स्फोटामुळे कंपनीला आग लागली. या आगीने काही मिनिटात रौद्र रुप धारण केले असून बाजूच्या कंपन्यांना देखील या आगीच्या झळा बसल्या आहेत.

 

या आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम चालू आहे. आग नेमकी कशामुळे लागली याबाबत काही समजू शकले नसल्याचे अग्नीशमन विभागाने सांगितले.
पाहा व्हिडीओ-