दहीहंडीची वर्गणी दिली नाही म्हणून बेकरीतील कामगारांना रस्त्यावर उभे करून त्यांच्याकडून रांगेत उठाबशा काढल्याचा प्रकार व्हिडिओच्या माध्यमातून समोर आला आहे. भोसरी-आळंदी रस्त्यावर १५ ऑगस्टच्या सुमारास ही घटना घडली असल्याचे समजते. या प्रकरणी अद्याप कोणीही तक्रार केलेली नसल्यामुळे पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, भोसरी-आळंदी रस्त्यावरील एका दहीहंडी मंडळाचे कार्यकर्ते वर्गणी मागण्यासाठी या भागातील एका बेकरीत गेले. बेकरीचे मालक जागेवर नसल्यामुळे तेथील कामगारांनी वर्गणी मागणाऱ्यांना नंतर येण्याची विनंती केली. पण वर्गणी देत नाही म्हणून मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सर्वच कामगारांना बेकरीच्या बाहेर काढले आणि त्यांना दमदाटी करण्यास सुरुवात केली. त्यानंतर या सर्व कामगारांना कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उठाबशा काढण्यास सांगितले. सर्व कामगारांकडून प्रत्येकवेळी ‘सॉरी’ही म्हणवून घेण्यात आले. या घटनेचे चित्रण मंडळाच्याच काही कार्यकर्त्यांनी केले आणि ते सोशल मीडियावर टाकण्यात आले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यामुळेच या प्रकाराचा पर्दाफाश झाला आहे.
दरम्यान, या प्रकरणी अद्याप पोलिसांकडे कोणतीही तक्रार देण्यात आलेली नाही. त्यामुळे संबंधित मंडळ कोणते, दमदाटी करणाऱ्या कार्यकर्त्यांचे नाव काय, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मंडळाच्या दहशतीमुळेच कार्यकर्त्यांविरुद्ध तक्रार देण्यास कोणी पुढे आले नसल्याचे समजते.

Pimpri, police died, police hit by vehicle,
पिंपरी : कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा अज्ञात वाहनाने धडक दिल्याने मृत्यू
stealing liquor, liquor Kalyan,
कल्याण : महागड्या मद्याच्या बाटल्यांवर चोरट्यांचा डल्ला, माल चोरून ढाब्यांना विक्री
policeman committed suicide by shooting himself in the head
नागपूर : डोक्यात गोळी झाडून पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या; कामाचा ताण की…
pune car fire marathi news, pune tempo fire marathi news
पुणे: मुंढव्यात वाहनांना आग; वाहने पेटविल्याचा संशय