पुण्याच्या दापोडी परिसरात पाणी पुरीचे पिठ पायाने मळत असल्याचा विडिओ आणि बातमी ‘लोकसत्ता ऑनलाइन’ने सर्वप्रथम दिली होती.याची दखल घेत आज रविवारी सकाळी एफडीआय च्या अधिकाऱ्यांनी दापोडी परिसरात दोन ठिकाणी धाड टाकली आहे. किशोर पाल आणि शिवनंदन जगधारी यांच्या पाणीपुरी उत्पादन करणाऱ्या ठिकाणी जाऊन धाड टाकण्यात आली.त्यांना दंडात्मक कारवाई करणार असून जोपर्यंत कायद्यातील कागदपत्रांची पूर्तता करणार नाहीत तोपर्यंत त्याचा व्यवसाय बंद ठेवणार असल्याचे माहिती सहाय्यक आयुक्त नारागुडे यांनी दिली आहे.
शनिवारी लोकसत्ता ऑनलाइन ने दापोडी परिसरात पायाने पाणीपुरीचे पीठ पायाने मळत तुडवत असल्याचा विडिओ समोर आणला होता.त्यानंतर मात्र विडिओ मधील संबंधित व्यक्ती फरार झाली असून रविवारी सकाळी एफडीआय च्या अधिकाऱ्यांनी थेट धाड टाकत कारवाई केली आहे.किशोर पाल आणि शिवनंदन जगधारी यांचा पाणीपुरी तयार करण्याचा व्यवसाय आहे.परंतु ज्या ठिकाणी ते पाणीपुरी तयार करतात तेथे अस्वछता आढळली असून अत्यंत घाणेरडी जागा असल्याचे निदर्शनास आले आहे.
पाणीपुरी खाणाऱ्यांनो सावधान, पुरीचे पीठ पायाने तुडवत असल्याचा व्हिडिओ आला समोर
तसेच दोघांकडे व्यवसाय चालवण्यासाठी परवाना नाही.विनापरवाना ते व्यवसाय करत आहेत.अस्वच्छ ठिकाण,खरेदी बिल नाहीत,कोणाला पाणीपुरी देता किंवा विकली जाते याचे बिल देखील नाहीत असे FDI च्या धाड सत्रामध्ये समोर आले आहे.ही कारवाई FDI चे सहाय्यक आयुक्त संजय नारागुडे,सहाय्यक आयुक्त श्रीमती भोईटे,अन्न सुरक्षा अधिकारी यांनी केली.यापुढे पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात धाड सत्र सुरूच राहणार आहे अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.