25 February 2021

News Flash

पुणे शहरात जय जवान मित्र मंडळ;  पिंपरीत जय बजरंग तरुण मंडळ प्रथम

या स्पर्धेला पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील गणेश मंडळांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

‘लोकसत्ता गणेशोत्सव स्पर्धे’च्या पारितोषिक वितरण सोहळ्यात पुनीत बालन एन्टरटेन्मेंट प्रा. लि. चे पुनीत बालन यांच्या हस्ते पुणे शहर विभागात प्रथम क्रमांक पटकाविलेल्या जय जवान मित्र मंडळाला शुक्रवारी पारितोषिक प्रदान करण्यात आले.

लोकसत्ता गणेशोत्सव स्पर्धा २०१८

सोसायटी विभागात ‘सरिता विहार गणेशोत्सव’ची बाजी

ढोल-ताशांचा निनाद आणि ‘गणपती बाप्पा मोरया’चा गजर करीत ‘गणराज रंगी’ नाचत, कार्यकर्त्यांचा अमाप उत्साह आणि सळसळत्या जल्लोषात ‘लोकसत्ता गणेशोत्सव स्पर्धे’तील विजेत्या मंडळांना शुक्रवारी पारितोषिके प्रदान करण्यात आली. पुणे शहर विभागात नाना पेठ येथील जय जवान मित्र मंडळाने तर, पिंपरी-चिंचवड विभागात निगडी येथील जय बजरंग तरुण मंडळाने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले. सोसायटी विभागात ‘सरिता विहार गणेशोत्सव’ने बाजी मारली.

ढोल-ताशांचा निनाद अजून गुंजन करीत असताना ‘लोकसत्ता गणेशोत्सव स्पर्धे’चा पारितोषिक वितरण सोहळा शुक्रवारी टिळक स्मारक मंदिरामध्ये रंगला. पुण्यनगरीच्या वैभवशाली गणेशोत्सवामध्ये विविध गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी साकारलेल्या देखाव्यांचे कौतुक करून प्रोत्साहन देण्याच्या उद्देशातून पुनीत बालन एन्टरटेन्मेंट प्रा. लि. प्रस्तुत ‘लोकसत्ता गणेशोत्सव स्पर्धा’ घेण्यात आली.

या स्पर्धेला पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील गणेश मंडळांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ‘कोण ठरणार पुरस्काराचे मानकरी’ ही उत्कंठा टिळक स्मारक मंदिर येथे झालेल्या सोहळ्यात शुक्रवारी संपली. पारितोषिक विजेत्या मंडळाच्या नावाची घोषणा होत असताना ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष करीत कार्यकर्त्यांनी उत्साहाने व्यासपीठावर जाऊन पारितोषिकांचा स्वीकार केला.

पुनीत बालन एन्टरटेन्मेंट प्रा. लि. चे पुनीत बालन आणि ‘लोकसत्ता’चे सहायक संपादक मुकुंद संगोराम यांच्या हस्ते पुणे शहर विभागात प्रथम क्रमांक पटकाविलेल्या जय जवान मित्र मंडळाला पारितोषिक प्रदान करण्यात आले. ‘बी. जी. चितळे’चे गिरीश चितळे, ‘इझी ड्राय’चे गणेश कुलकर्णी, ‘बुलडाणा अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी’च्या मिथिला मांडरे, ‘फिनोलेक्स पाइप्स’चे महेश मंत्री, ‘प्रकाश मसाले’चे राजेंद्र जोशी या वेळी उपस्थित होते.

पुणे शहर विभाग

* प्रथम : जय जवान मित्र मंडळ, नाना पेठ

* द्वितीय : साईनाथ मंडळ ट्रस्ट, बुधवार पेठ

* तृतीय : छत्रपती राजाराम मंडळ, सदाशिव पेठ

*ल्ल उत्तेजनार्थ : संयुक्त आझादनगर मित्र मंडळ, आझादनगर,

ॐ हरिहरेश्वर मंडळ, शनिवार पेठ, काळभैरवनाथ तरुण मंडळ, गणेश पेठ

* पर्यावरणपूरक सजावट : श्री पोटसुळ्या मारुती मंडळ, गणेश पेठ

* कला दिग्दर्शक : सिद्धार्थ तातुसकर, त्वष्टा कासार मंडळ, कसबा पेठ

* संहितालेखक : वैभव वाघ, सेवा मित्र मंडळ, शुक्रवार पेठ

* सामाजिक जागृती : आदर्श मित्र मंडळ, धनकवडी

पिंपरी-चिंचवड विभाग

* प्रथम : जय बजरंग तरुण मंडळ, निगडी

* द्वितीय : राष्ट्रतेज तरुण मंडळ, काळभोरनगर

* तृतीय : लांडगे-निंबाची तालीम मंडळ, भोसरी

* पर्यावरणपूरक सजावट : जयहिंदू मित्र मंडळ, प्राधिकरण

* कला दिग्दर्शक : गणेश गोरखे, अखिल मंडई मित्र मंडळ, चिंचवडगाव

* संहितालेखक : स्वप्नील शिंदे, आदर्श मित्र मंडळ, संत तुकाराम नगर

* सामाजिक जागृती : श्रीकृष्ण क्रांती मित्र मंडळ, आकुर्डी

पुनीत बालन एन्टरटेन्मेंट प्रा. लि. प्रस्तुत

लोकसत्ता गणेशोत्सव स्पर्धा २०१८

* सहप्रायोजक : फिनोलेक्स इंडस्ट्रीज लि., पु. ना. गाडगीळ आणि सन्स

* पॉवर्ड बाय : मँगो हॉलिडेज, चितळे घी, मांडके हिअिरग सव्‍‌र्हिसेस, प्रकाश मसाले-लोणची, इझी ड्राय

* बँकिंग पार्टनर : बुलडाणा अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी पुनीत बालन एन्टरटेन्मेंट प्रा. लि. प्रस्तुत

लोकसत्ता गणेशोत्सव स्पर्धा २०१८

* सहप्रायोजक : फिनोलेक्स इंडस्ट्रीज लि., पु. ना. गाडगीळ आणि सन्स

* पॉवर्ड बाय : मँगो हॉलिडेज, चितळे घी, मांडके हिअिरग सर्व्हिसेस, प्रकाश मसाले-लोणची, इझी ड्राय

* बँकिंग पार्टनर : बुलडाणा अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2018 1:51 am

Web Title: loksatta ganesh utsav tournament 2018 result
Next Stories
1 ‘एफटीआयआय’मध्येही ‘मीटू’
2 ‘बुक कॅफे’ना वाचकांची पसंती
3 कोथरुड येथील कचरा डेपोला आग
Just Now!
X