News Flash

कोव्हिशिल्ड लसीचा प्लांट पूर्णपणे सुरक्षित – उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे यांनी पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटची केली पाहणी

(संग्रहित छायाचित्र)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला भेट देत आग लागलेल्या ठिकाणाची पाहणी केली. पाहणी केल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी कोव्हिशिल्ड लसीचा प्लांट पूर्णपणे सुरक्षित असल्याची माहिती दिली. करोना प्रतिबंधक ‘कोव्हिशिल्ड’ लसची निर्मिती करणाऱ्या पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटच्या मांजरी येथील इमारतीलमध्ये गुरुवारी दुपारी आग लागली. बीसीजी लस तयार केली जाणाऱ्या या इमारतीत लागलेल्या आगीत होरपळून पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यानंतर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घटनास्थळाची पाहणी केली.

पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटमध्ये भीषण आग

“आशेचा किरण लस बनवणाऱ्या केंद्रात आग लागली आमि सर्वांच्याच काळजाचा ठेका चुकला. दुर्दैवाने पाच जणांचा मृत्यू झाला. सुदैवाने कोव्हिशिल्ड लस सुरक्षित आहे. आग लागली तेथील दोन मजले वापरात होते. वरील ठिकाणी जिथं केंद्र सुरु होणार होतं तिथे आग लागली. सर्वांना जी एक शंका आणि भीती वाटत होती. मात्र करोना लसीला कोणताही फटका बसलेला नाही,” अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली.

“आगीची सखोलपणे चौकशी केली जात आहे. अहवाल येत नाही तोवर निष्कर्ष काढणं योग्य ठरणार नाही,” असं उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं. पत्रकार परिषदेत सीरमचे सीईओ अदर पूनावालादेखील उपस्थित होते. आगीत एक हजार कोटींपेक्षा अधिक नुकसान झाल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. बीसीजीसह इतर औषधांच्या साठ्यावर परिणाम झाला असून आमचे जे नवे प्रोडक्ट्स येणार होते त्यांच्यावरही प्रभाव पडल्याचं ते म्हणाले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 22, 2021 5:41 pm

Web Title: maharashtra cm uddhav thackeray pune serum institute fire sgy 87
Next Stories
1 बंगालवरून आणलेल्या मातीचे सोने होईल; पुण्यात सराफाला ५० लाखांचा गंडा
2 म्हाडाचं घर हवंय? अजित पवारांनी दिला ‘हा’ सावधानतेचा इशारा
3 पुणे : …म्हणून ABVP ने जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच भरवला वर्ग
Just Now!
X