25 February 2021

News Flash

गुंड गजानन मारणेच्या ‘त्या’ मिरवणुकीवर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

गजानन मारणेकडून कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे

गुंड गजानन मारणे याने तळोजा कारागृह ते पुण्यापर्यंत जंगी मिरवणूक काढल्या प्रकरणाची सध्या राज्यात चर्चा सुरु आहे. सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कोथरूड पोलिसांनी गजानन मारणेसह नऊ जणांना अटक केली. पुणे जिल्हा सत्र न्यायालयात हजर केलं असता त्यांनी प्रत्येकी १५ हजारांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूरही करण्यात आला. मात्र राज्यात अशाप्रकारे गुंडाने मिरवणूक काढून कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे काढल्याचं बोललं जात आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

शिवजंयतीनिमित्त शिवनेरी गडावर अजित पवारांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना गजानान मारणेकडून काढण्यात आलेल्या मिरवणुकीसंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “त्यासंदर्भात पोलीस अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला आहे. त्याची माहिती आल्यानंतर कारवाई केली जाईल”.

पुणे: कुख्यात गुंड गजानन मारणेसह साथीदारांवर गुन्हा दाखल; दहशत पसरविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप

पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, “कायदा सुव्यस्थेच्या दृष्टीनं अडचणी निर्माण करणारं कोणीही असो मग ती राजकीय क्षेत्रातील असेल, गुंडगिरी करणारी, किंवा टोप्या घालणारी असेल…कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वांसाठी नियम लावले गेले पाहिजे. सर्वांनी चौकटीत राहूनच आपलं काम केलं पाहिजे”.

काय आहे प्रकरण –
गजानन मारणे हा खुनाच्या प्रकरणात तळोजा कारागृहात होता. मात्र न्यायालयाने त्याची निर्दोष मुक्तता केल्याने समर्थकांनी कारागृह ते पुण्यापर्यंत ३०० चारचाकी वाहनांचा ताफा सोबत घेऊन त्याचं जंगी स्वागत केलं.

सोमवारी तळोजा कारागृहातून गुंड गजानन मारणे याची सुटका झाली होती. त्याचं स्वागत करण्यासाठी ३०० पेक्षा अधिक वाहनं आणि तरुण एकवटले होते. तळोजा कारागृह ते पुणे यादरम्यान शक्तीप्रदर्शन करत मारणे याच्या साथीदारांनी पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर वाहनांच्या रांगा लावल्या होत्या. त्याचदरम्यान, द्रुतगती मार्गावरील उर्से टोल नाका येथे फूड मॉलजवळ मारणे याच्यासह सर्व कार्यकर्ते थांबले होते. त्यांनी आरडाओरडा करत बेकायदेशीर गर्दी जमवून फटाके वाजवले. तसंच, ड्रोनने चित्रीकरण करत दहशतीचं वातावरण निर्माण केलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 19, 2021 12:20 pm

Web Title: maharashtra deputy cm ajit pawar on gajanan marne rally taloja to pune sgy 87
Next Stories
1 पिंपरी पालिकेचे ७,११२ कोटींचे अंदाजपत्रक
2 दहा महिने वीजबिल न भरणाऱ्या ३६ हजार ग्राहकांची बत्ती गुल
3 वेळेत करभरणा करणाऱ्यांना सवलत
Just Now!
X