News Flash

महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेत ‘मेकॅट्रॉनिक्स’

केवळ युवतींसाठी असलेल्या या अभ्यासक्रमामुळे युवतींनाही ऑटोमोटिव्ह क्षेत्रात येण्यास आता प्रोत्साहन मिळणार आहे.

मर्सिडीझ-बेन्झ इंडिया आणि महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था यांच्यात ‘अ‍ॅडव्हान्स्ड डिप्लोमा इन ऑटोमेटिव्ह मेकॅट्रॉनिक्स’ या अभ्यासक्रमासाठी सामंजस्य करार करण्यात आला.

अभ्यासक्रमाअंतर्गत स्वयंशिक्षणाच्या पद्धतीवर भर

अभियांत्रिकी क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासासाठी, तसेच त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी मर्सिडीझ-बेन्झ इंडियाने सामाजिक उत्तरदायित्वाअंतर्गत ‘अ‍ॅडव्हान्स्ड डिप्लोमा इन ऑटोमेटिव्ह मेकॅट्रॉनिक्स’ या अभ्यासक्रमासाठी महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेबरोबर सामंजस्य करार केला. कंपनीने केलेला हा पुण्यातील दुसरा, तर देशातील सातवा सामंजस्य करार आहे.

सामंजस्य करार करताना मर्सिडीज-बेन्झ इंडियाचे संतोष अय्यर, महर्षी स्त्री कर्वे शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष स्मिता घैसास आणि सचिव डॉ. पी.व्ही.एस. शास्त्री उपस्थित होते. हा अभ्यासक्रम स्वयंशिक्षणाच्या पद्धतीवर भर देणारा आहे.

विद्यार्थ्यांना ऑटोमोबाइल्सच्या जगातील अद्ययावत तांत्रिक शोधांची माहिती घेतानाच कौशल्य विकास साधण्यास अभ्यासक्रमामुळे मदत होणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले. केवळ युवतींसाठी असलेल्या या अभ्यासक्रमामुळे युवतींनाही ऑटोमोटिव्ह क्षेत्रात येण्यास आता प्रोत्साहन मिळणार आहे.

आतापर्यंत हा अभ्यासक्रम पुणे, औरंगाबाद आणि तिरुअनंतपुरम येथील विविध सरकारी संस्थांमध्ये राबविण्यात आला असून  ५४० विद्यार्थ्यांना मेकॅट्रॉनिक्स अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 15, 2018 2:15 am

Web Title: maharishi karve female education institute in mechanics
Next Stories
1 अनिवासी भारतीयांच्या पालकांना ‘नृपो’चा मदतीचा हात
2 ‘कॉसमॉस’वर सायबर दरोडा
3 कॉसमॉस बँकेची ऑनलाइन, एटीएम सेवा तीन दिवस बंद राहणार, बँकेतून व्यवहार करण्याचे आवाहन
Just Now!
X