News Flash

पुणे हादरलं! पत्नीचा गळा दाबून, तर एका वर्षांच्या चिमुकल्याची सुरीने हत्या; स्वतः घेतला गळफास

बेरोजगारीमुळे अवघं कुटुंब उद्ध्वस्त

पत्नी प्रज्ञा आणि पती हनुमंत शिंदे.

करोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाउन सदृश्य निर्बंधांच्या झळा आता सर्वसामान्य कामगारांना बसू लागल्या आहेत. बेरोजगारीमुळे ओढवलेल्या आर्थिक समस्यांमुळे अवघं कुटुंबच उद्ध्वस्त झाल्याची घटना पुणे जिल्ह्यात घडली आहे. एका व्यक्तीने बेरोजगारीमुळे पत्नीचा गळा दाबून तर एका वर्षाच्या चिमुकल्याचा सुरीने गळा कापून खून केला. दोघांच्या हत्येनंतर स्वतः गळफास घेऊन जीवनप्रवास संपवल्याची भयंकर घटना घडली आहे. लोणी काळभोर परिसरात घडलेल्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

हनुमंत शिंदे या (वय ३८) व्यक्तीने पत्नी प्रज्ञा शिंदे (वय २८) आणि एक वर्षाचा मुलगा शिवतेज शिंदे या दोघांचा खून करून आत्महत्या केली आहे. हे कुटुंब लोणी काळभोरमधील कदम वाक वस्ती येथे वास्तव्याला होते. पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर परिसरात हनुमंत शिंदे ही व्यक्ती पत्नी व मुलासोबत अनेक वर्षापासून राहत होता. गाडीवर चालक म्हणून काम करून तो कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचा. पण काम नसल्याने अनेक दिवसांपासून ते तणावात असायचे.

याबाबत पत्नी प्रज्ञा यांनी हनुमंत यांच्या नातेवाईकांना सांगितले होते. पती हनुमंत शिंदे यांना समजून सांगण्याची विनंती त्यांनी नातेवाईकांकडे केली होती. पण, दुर्दैवी घटना घडलीच. दरम्यान ९ मे रोजी सकाळी ११ ते साडेअकराच्या सुमारास हनुमंत यांनी पत्नी प्रज्ञाचा गळा दाबून खून केला. तर एक वर्षाचा शिवतेज याचा सुरीने गळा कापला. त्यानंतर घरातील पंख्याला ओढणीच्या सहाय्याने हनुमंत याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमागे आणखी काही कारण आहे का? याचाही तपास केला जात असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 10, 2021 1:15 pm

Web Title: man killed wife and son pune crime news pune letest news bmh 90 svk 88
Next Stories
1 पुण्यातील काका हलवाई दुकानाला लागली आग
2 करोनाबाधित रुग्णाची रुग्णालयात गळफास घेऊन आत्महत्या
3 डॉ. माधव गाडगीळ यांचे बांबूच्या प्रजातीला नाव 
Just Now!
X