भर गर्दीत रेल्वेच्या दारात उभे राहून हुल्लडबाजी करत असतानाच देहू रेल्वेस्टेशन येथे एक तरूण रेल्वेतून खाली पडला. त्यानंतर, तो रूळाखाली आल्याने त्याला स्वत:चे दोन्ही पाय गमवावे लागले आहेत. अशाप्रकारे स्टंटबाजी करूच नये, असे आवाहन रेल्वे पोलिसांनी केले आहे.सचिन सत्यवान डुलगज (वय-२३, रा. एमबी कँप, देहूरोड) असे या तरूणाचे नाव आहे. देहूरोड स्टेशन येथे हा प्रकार घडला आहे. देहूरोड स्टेशनवरून तो लोणावळा-पुणे या लोकलने प्रवास करत होता. सुरूवातीपासून दरवाजात उभे राहून तो स्टंटबाजी करत असल्याचे इतर प्रवाशी पाहत होते. याच नादात तो रेल्वेतून खाली पडला आणि त्याचे पाय रेल्वेच्या रूळाखाली आले. त्यामुळे त्याला दोन्ही पाय गमवावे लागले आहेत. यासंदर्भात, रेल्वे पोलिसांनी सांगितले की, तो हुल्लडबाजी करत होता. असे प्रकार कोणीही करू नयेत, असे आवाहन पोलीसांनी केले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 7th Jun 2016 रोजी प्रकाशित
रेल्वेच्या दरवाजात स्टंटबाजी करणाऱ्या युवकाचे खाली पडून दोन्ही पाय निकामी
चिन सत्यवान डुलगज (वय-२३, रा. एमबी कँप, देहूरोड) असे या तरूणाचे नाव आहे
Written by लोकसत्ता टीम
Updated:
First published on: 07-06-2016 at 00:03 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man loses legs after fall from local train