नैर्ऋत्य मोसमी पाऊस अर्थात मान्सून शुक्रवापर्यंत (५ जून) केरळच्या किनाऱ्यावर दाखल होण्यास अनुकूल स्थिती असल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. त्यामुळे आता तो केरळात कधी पोहोचतो याबाबत उत्सुकता आहे. मान्सून २८ मे रोजी केरळच्या उंबरठय़ावर पोहोचला. मात्र, तेव्हापासून तो पुढे सरकलेला नाही. हवामान विभागाच्या सुधारित अंदाजानुसार तो ५ जूनपर्यंत केरळात दाखल होण्याची चिन्हे आहेत. त्यानुसार त्याच्या पुढे सरकण्यास अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे, असे हवामान विभागाने जाहीर केले आहे. तो केरळात पोहोचल्यानंतर त्याचा पुढचा प्रवास कसा होणार याबाबतही उत्सुकता आहे.